अवैध रेती तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर वर भद्रावती पोलिसांची कारवाई**चार ट्रॅक्टर व 11 आरोपींसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त*
*चार ट्रॅक्टर व 11 आरोपींसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त*
अतुल कोल्हे भद्रावती.
तालुक्यातील मांगली येथील नाल्यातून अवैध रित्या रेती तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर वर भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत चार ट्रॅक्टर सह 11 आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी दिनांक 24 रोज बुधवारला मध्यरात्रीनंतर मांगली येथील नाल्याजवळ केली. या कारवाईत चार ब्रास रेतीसह एकूण वीस लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती भद्रावती पोलिसांनी दिली आहे. सदर नाल्यावरून रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी मांगली नाल्याजवळ मध्यरात्री नंतर सापळा लावला. त्यावेळी हे चारही ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरून नाल्यातून निघाले. या चारही ट्रॅक्टर मध्ये प्रत्येकी एक ब्रास अवैध रेती आढळून आली. हा सर्व मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार विपिन इंगळे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राहुल किटे, धर्मराज मुंडे, जगदीप झाडे, निकेश ढेंगे व विश्वनाथ चुदरी यांनी केली.
Comments
Post a Comment