बँकेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न फसला.

बँकेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न फसला.

वरोरा 
चेतन लुतडे
वरोऱ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असणार्या टेंमुर्डा गावात बँकेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न फसला.

चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेंमुर्डा गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेला लागूनच ग्रामपंचायत कार्यालय आहे. या ठिकाणी भिंत फोडून ग्रामपंचायत मधील सीसीटीव्ही डीव्हीआर आणि एलईडी चोरट्यांनी पळवली आहे. यानंतर बँकेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता मात्र कुत्र्यांच्या भूकण्याचा आवाज सुरू झाला आणि शेजारील व्यक्तींनी काहीतरी आवाज येत असल्याची खात्री करून घेताच.
आरडा ओरड सुरू झाली. त्यामुळे दोन चोरट्यांनी त्या ठिकाणावरून पोबारा केला. ही सगळी माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी वरोरा पोलीस ठाणेदार अमोल काचोरे यांनी कडक बंदोबस्त लावून तपास सुरू केला आहे.

Comments