राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक भवन संस्काराचे केंद्र व्हावे* *आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन*

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक भवन संस्काराचे केंद्र व्हावे* 

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन* 
 चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यामध्ये महिलांचा विचार केला आहे. महिलांनी शिक्षित होऊन कुटुंबाला पुढे न्यावे. मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांना घडवावे. शासनाने महिलांना आरक्षण दिले, असतानाही महिला पुढे येत नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी पुढे यावे. मुला-मुलींना चांगले संस्कार द्यावेत. ग्रामगीतेचा महिलांनी अभ्यास केला, तर त्यांना प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंतांनी महिलांच्या उन्नतीवर भर दिला आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांचा घरामध्ये जागर झाला पाहिजे. असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. 

एकार्जुना येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

यावेळी अ. भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे, अ. भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे, एकार्जुना सरपंच उज्वला थेरे, ग्रामसेवक रजनी घुगुल, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, बाळू चिंचोलकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज चिंचोलकर यांची उपस्थिती होती.   

     पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाले कि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून ग्रामीण विकासाला दिशा दिली. ग्रामगीतेमध्ये मातृशक्तीला विशेष स्थान दिले आहे. घर, कुटुंब यावर विशेष भर दिला. ग्रामगीतेतील विचार महिलांनी आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करावी. राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजावे, भावी पिढीसोबत राष्ट्रंसंतांचे विचार पोहचविण्यासाठी युवा पिढींनी ग्रामगीतेचे ज्ञानार्जन करणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रसंतांच्या सर्व कार्यक्रमात ग्रामगीतेचे वाचन करण्याचा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

Comments