विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात *केंद्रीय मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे*

विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात

वरोरा
चेतन लुतडे 
      
  केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदिपसिंग पुरी 16 डिसेंबर ला खेमजई येथे शासकीय कार्यक्रमाकरिता आले होते.

यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत मोदी सरकारने केलेली वैशिष्ट्यपूर्ण कामांची नोंद ग्रामीण जनतेपुढे मांडली.

देशातील चार करोड लोकांनी आवास घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे. मागील सरकारने फक्त चार लाख घरकुल योजना जाहीर केल्या होत्या.  

भारतात 14 करोड गॅस कनेक्शन  2014 सालात होते. आता 32000 करोड गॅस कनेक्शन देशातील लोकांना देण्यात आले आहे.
2004 ते 2014 पर्यंत घरकुल आवास योजनेत 4000 घरे बनवले होते. मोदी सरकार आल्यापासून शहरी आणि गावातील सर्व मिळून चार करोड घरकुल आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे.

विकास भारत विकसित भारत संकल्प यात्रेत
 अठरा हजार गावांमध्ये वीजपुरवठा नव्हता 
6लाख 50 हजार गावांमध्ये विद्युत वितरण सरकारने केले आहे. 
2014 मध्ये शौचालय नाही च्या बरोबर होते. मोदी सरकार आल्यापासून 12 करोड पेक्षा जास्त शौचालय बनवण्यात आले आहे.
50 करोड पेक्षा जास्त लोकांना जनधन खात्याचा लाभ देण्यात आला आहे.
13 करोड लोकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

महिलांना आर्थिक शक्तीकरण मोदी सरकारने केले आहे.

2047 विकसित भारत बनवण्याची स्वप्न असून 
भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर नेण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहे.

3200 गाड्या विकसित भारत योजनेच्या अंतर्गत सरकारी प्रचारार्थ भारतात भ्रमण करणार असून 
उज्वला सिलेंडरचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत, किसान पेन्शन योजना, आवास योजना, महिला सशक्तिकरण संबंधातील योजना, अशा अनेक वेगवेगळ्या योजनेचा लाभ मोदी सरकारने जनतेला दिलेला आहे. या विकसित भारत संकल्पनेसाठी देशभरात राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेला पटवून देण्याची काम मोदी सरकार करत असल्याचे दिसून येत आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी चंद्रपूर  पालकमंत्री सुधीर भाऊ मनगंटीवार माजी मंत्री हंसराज अहिर , जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी,  कार्यकर्ता व पदाधिकारी, गावातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पंतप्रधानाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
विकसित भारत संकल्प यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरोरा तालुक्यातील खेमजाई गावातील कार्यक्रमाशी संवाद साधला.

*केंद्रीय मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे*


*केंद्रीय मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे*

    शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा, शेतमालाला योग्य भाव, वेगळा विदर्भ यासह शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज 16 डिसेंबर रोज शनिवारला खेमजई येथे शासकीय कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग  पुरी यांना ते कार्यक्रम स्थळी जात असताना सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी  आपल्या तीन-चार सहकार्यासह आसाळा गावाजवळ काळे झेंडे दाखवले व शासनाचा निषेध नोंदवला.
            
          किशोर डुकरे यांनी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्र्यांना  काळे झेंडे दाखवण्याचे जाहीर केले होते.त्यामुळे पोलीस त्यांच्या शोधात होते. परंतु डुकरे हे त्यांच्या हाती लागले नाहीत. ते शेतातील पिकात लपले होते.मंत्र्याचा ताफा येताच शेतातून बाहेर येत त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय जवान जय किसान हा नाराही लावला. किशोर डुकरे  यांनी अचानकपणे बाहेर येऊन मंत्र्यांना काळे झेंडे दाखवितात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये खळबळ माजली. पोलिसांनी लगेचच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत किशोर डुकरे यांना त्यांच्या सहकार्‍यांसह ताब्यात घेतले व शेगाव पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केले होते.

Comments