आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते मोरवाहीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन**

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते मोरवाहीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन**

चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल तालुक्यातील मोरवाही येथे युवा बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने दिवगंत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. २५ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत होत आहे. 

या स्पर्धेत एक गाव एक संघ या तत्त्वावर खेळाडूंना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व गावांमधून खेळाडूंची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दि. २५ डिसेंबर  रोजी सायंकाळी ४ वाजता झाले. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन  आमदार वरोरा विधानसभा प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा तालुका कँग्रेस अध्यक्ष रवी मारपल्लीवार, वैशाली पुल्लावार, अशोक पुल्लावार, आशिष अहिरकर, सुधाकर भिवनकर, गोविंदा रोहणकर, साईनाथ गेडेकर, सरपंच अनुराधा नेवारे, झरकर यांची उपस्थिती होती.     

उद्घाटन सोहळ्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी खेळाडूंना प्रामाणिकपणे खेळण्याचा सल्ला दिला. त्यांनी खेळातून हार-जीत हा स्वाभाविक भाग असल्याचे सांगितले. खेळातून शिकणे आणि वाढणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील १५ गावांमधील संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे सामने अतिशय चुरशीचे होत आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या तर्फे देण्यात आहे. तसेच खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना स्मृती चिन्ह (शिल्ड ) देण्यात आले आहे. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी युवा बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले . 
या स्पर्धेमुळे मोरवाहीत कबड्डी खेळाला चालना मिळेल आणि तरुण खेळाडूंना स्पर्धा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Comments