वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

तीन राज्यातील अभुतपूर्व विधानसभा निवडणुकीतील विजयाचा यशाबद्दल**वरोरा येथे भाजपा* *कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष*

*तीन राज्यातील अभुतपूर्व विधानसभा निवडणुकीतील विजयाचा यशाबद्दल*
*वरोरा येथे भाजपा* *कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष*


वरोरा - मान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने वरोरा शहरात भाजपा 
lकार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत,वाजा गाजा सोबत नाचत  विजयाचा जल्लोष साजरा केला आणी नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. 

   या प्रसंगी अहेतेशाम अली -  माजी नगराध्यक्ष न प वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा, बाबासाहेब बागडे, सुरेश महाजन, ओम मांडवकर, बाळूभाऊ भोयर, विठलजी लेडे,विनोद लोहकरे, राजूभाऊ दोडके,उमेशभाऊ बोढ़ेकर,अमित चवले,जगदीश तोटावर, सौ. संगीताताई निंबाळकर, सौ. कीर्तीताई कातोरे, सौ. चंद्रकलाताई मते, सौ. सुजाता ताई दुर्गापुरोहित सौ. अनुराधाताई दुर्गे,मधुसूदन टिपले, श्याम ठेंगडी सर,प्रकाश दुर्गापुरोहीत, गजानन राऊत, दिलीप घोरपडे, देविदास ताजने, अक्षय भिवदरे, गोपाल कातोरे कवीश्वर मेश्राम ,परसराम मरस कोल्हे,संतोष पवार,ओम यादव, राजेश साकोरे,गंगाधर कारेकार, त्रिशूल घाटे,गणोरकर सर, प्रेमकेशवानी या सर्वांची या प्रसंगी उपस्थिती होती.

Comments