*प्रा. धनराज आस्वले आता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे आजीवन अध्यक्ष तर सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे सेक्रेटरी पदावर*

*प्रा. धनराज आस्वले आता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे आजीवन अध्यक्ष तर सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे सेक्रेटरी पदावर*

*राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने सामाजिक कार्य बाधित होवू नये म्हणून रविंद्र शिंदे यांचा ट्रस्टच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा*

वरोरा/भद्रावती :
           स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था कोविड-१९ प्रादुर्भाव काळापासून आरोग्य, सामाजिक, क्रीडा, प्रबोधन, शैक्षणिक दत्तक, अभ्यासिका, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, युवा योजना आदी क्षेत्रात उत्तम कार्य करून परिसरात नावारूपास आली आहे. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. तर प्रा. धनराज आस्वले हे कार्यकारी अध्यक्ष होते. यांच्या मार्गदर्शनात ट्रस्ट जिल्ह्यात व प्रामुख्याने वरोरा तथा भद्रावती तालुक्यात विविध क्षेत्रात जनहितार्थ कार्य करत आहे. सामाजिक कार्यासोबत राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्याने रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता ते ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत राहील व ट्रस्ट चे कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले यांना धर्मदाय आयुक्त चंद्रपुर कार्यालयातून सर्व कायदेशीर बाबाने परवानगी घेवुन अध्यक्ष बनविण्यात आले आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे यांच्या कडे ट्रस्टच्या सेक्रेटरी पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.
          राजकीय क्षेत्रात काम करीत असल्याने सामाजिक कार्य बाधित होवू नये, या उद्देशाने ट्रस्टचे अध्यक्षपद सोडल्याचे रविंद्र शिंदे म्हणाले तर ट्रस्ट अंतर्गत कार्य करण्याची इच्छा असलेल्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नियमानुसार रीतसर ट्रस्ट कडे अर्ज करून ट्रस्टचे विश्वस्त म्हणून ट्रस्ट अंतर्गत सामाजिक क्षेत्रात काम करत राहील असेही ते पुढे म्हणाले.
           सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले हे  उच्चविद्या विभूषित आहेत. प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले यांचा भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा या गावातून प्रवास सुरू झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले असून त्यांचे बी.एड., एम.फिल. झाले आहे. सध्या ते समाजशास्त्र विषयात एम.ए. करीत आहे. सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांच्या आयुष्याची कारकीर्द गेली. परदेशात बहरीन येथे छत्तीस वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जगभरात एकोणचाळीस देशांना त्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रहीत व समाजहित जोपासत त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. 
            ट्रस्टद्वारे ग्रामीण व शहरी भागात श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान सुरु आहे. दिव्यांगाना सायकल वाटप, कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतकार्य, कोरोनाने मृत, आत्महत्याग्रस्त, निराधार, गरीब गरजू पालकांच्या पाल्यांचा मोफत विवाह सोहळा, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजना, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकरी-शेतमजूर, पाळीव प्राणी यांना मदतकार्य, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, क्रीडा स्पर्धा, लघु व्यावसायिकांना मदत, आत्महत्येच्या मार्गावर असलेल्यांना धीर देण्याचे कार्य, सामाजिक जागृती हेतूने विविध बौध्दिक मार्गदर्शनपर उपक्रम, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, आदी विविधांगी कार्य सुरू आहेत व दिवसेंदिवस ट्रस्टच्या कार्याचा आलेख वाढत आहे. अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्याची भर पडत आहे व ट्रस्टचा आवाका वाढत आहे. त्यानुसार ट्रस्टला जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आले आहे.
          ट्रस्टच्या सेवेचा लाभ घ्यावा व सामाजिक क्षेत्रात आवड असलेल्यांनी ट्रस्ट सोबत जुडावे असे ट्रस्टचे नवे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले म्हणाले.

Comments

Post a Comment