पोषण सुरक्षे करिता भरडधान्याचा वापर आवश्यक.* - डॉ. अमोलकुमार सोळंके वरिष्ठ शास्त्रज्ञ भा कृ अ प नवी दिल्ली
*पोषण सुरक्षे करिता भरडधान्याचा वापर आवश्यक.* - डॉ. अमोलकुमार सोळंके वरिष्ठ शास्त्रज्ञ भा कृ अ प नवी दिल्ली
वरोरा
सध्या आपल्या देशातील अन्नसुरक्षितता मजबूत असून आता आपल्याला पोषण सुरक्षे कडे जायचे आहे त्याकरिता भरड धान्याचा वापर हा अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अमोलकुमार सोळंके यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी चारगाव तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील शेतकरी मेळाव्यात केले.
भारतीय कृषी अनुसंधान संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संस्था नवी दिल्ली, कृषी विभाग महाराष्ट्र राज्य, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा तथा ध्रुवतारा ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड वरोरा च्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या पर्वावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला उद्घाटक म्हणून श्री सुशील लव्हटे उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा , प्रमुख पाहुणे डॉ. पी के मंडल मुख्य शास्त्रज्ञ नवी दिल्ली , डॉ. नवीन गुप्ता वरिष्ठ शास्त्रज्ञ नवी दिल्ली तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सतीश इमडे सहाय्यक प्राध्यापक आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा ,डॉ रामचंद्र महाजन आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, श्री यशवंत सायरे मानद सचिव वैनगंगा शेतकरी उत्पादक कंपनी संघ चंद्रपूर, श्री बालाजी धोबे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालक कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, श्री योगेश वायदुडे सरपंच चारगाव (बु) , श्री दयारामजी ननावरे अध्यक्ष विविध सहकारी सोसायटी चारगाव , श्री अभिजीत पावडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, श्री विजय काळे कृषी अधिकारी, श्री प्रफुल आडकीने कृषी पर्यव्यक्षक वरोरा हे मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक म्हणून बोलताना श्री सुशांत लव्हटे उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी विविध योजनांच्या माध्यमातून उभे असून त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच जमिनीतील पोषक मूलद्रव्ये वाढवावे असे आवाहन प्रसंगी केले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असताना डॉ रामचंद्र महाजन यांनी भरड धान्याचे मानवी जीवनातील महत्त्व आणि त्याचा वापर अधिकाधिक कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले तसेच डॉ सतीश इमडे यांनी स्थानिक वातावरणामध्ये कुठल्या भरड धान्य उत्पादनावर भर द्यावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून भरडधान्याच्या विपणना संदर्भात श्री बालाजी धोबे, श्री यशवंत सायरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यात शेतकऱ्यांना शेतीच्या दैनंदिन वापरातील उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे संचालन सौ स्मिता सोनेकर, श्री चंद्रशेखर झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रवीण भांडारकर यांनी केले . मेळाव्याचे आयोजन कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालक श्री संदीप सोनेकर यांच्या नेतृत्वात कंपनी संचालक, प्रवर्तक श्री अभय पारखी , श्री उल्हास बोढे, श्री किशोर डोंगरकर , श्री विजय पावडे , श्री प्रशांत काकडे , श्री नितिन आडे यांच्या मदतीने करण्यात आले . सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील जवळपास 250 शेतकरी तथा शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment