संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

वरोरा तालुका क्रीडा संकुलन होणार अद्यावत व सुसज्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या प्रयत्नाला यश*

*वरोरा तालुका क्रीडा संकुलन होणार अद्यावत व सुसज्ज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या प्रयत्नाला यश*

वरोरा

 वरोरा तालुका क्रीडा संकुलनाची निर्मिती बऱ्याच वर्षांपूर्वी झाली परंतु त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक वर्षापासून क्रीडा संकुलनामध्ये सुविधा उपलब्ध करू शकले नाही माननीय नामदार संजय बनसोडे साहेब चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वरोरा येथे रत्नमाला चौकात 20 नोव्हेंबर 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा तर्फे तालुका क्रीडा संकुलनाबाबत निवेदन देण्यात आले होते नामदार संजय बनसोडे साहेबांनी याबाबत सकारात्मक चर्चा करून न्याय देऊ असे आश्वासन दिले होते लगेच डिसेंबर महिन्यात सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने साहेबांना भेटलो असता त्यांच्यासोबत पुन्हा त्या विषयावर चर्चा करून दिलेला शब्द पाळला व वरोरा तालुका क्रीडा संकुलनासाठी 13,93 55,592(तेरा कोटी त्र्यांनवलाखा पंचावन्न हजार पाचशे ब्यानव हजार रुपये) निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसाठी ते प्रकरण प्रधान सचिव वित्त क्रीडा विभागा कडे सचिवालयाला पाठवण्यात आले त्याबद्दल माननीय नामदार संजय बनसोडे साहेब क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलासराव नेरकर तालुकाध्यक्ष रवींद्र भोयर शहराध्यक्ष चंद्रकांत कुंभारे भद्रावती तालुकाध्यक्ष राजू बोरकर वरोरा युवक तालुका अध्यक्ष दिनेश मोहरे यांनी व्यक्त केले

Comments