भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते जि एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड याना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार प्रदान

भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते जि एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड याना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार प्रदान 
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2023: 
जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड (GWEL), जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (GPUIL) चा एक भाग असलेल्या विद्युत निर्मिती क्षेत्रातील कंपनीस  पॉवर प्लांट श्रेणी अंतर्गत 33 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 मध्ये प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. 100 मेगावॅट पेक्षा जास्त विद्युत निर्मिती करणाऱ्या पॉवर प्लांट गटात हा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला .  GWEL ने हा पुरस्कार पटकावण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती  द्रौपदी मुर्मू, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्याच दिवशी ब्युरो ऑफ एनर्जी कॉन्सर्व्हेशन , ऊर्जा मंत्रालय भारत सरकार द्वारे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड द्वारे सि इ ओ श्री आशिष बासू व सि ओ ओ थर्मल श्री धनंजय देशपांडे यांनी हा पुरस्कार महामहिम राष्ट्रपती कडून स्वीकारला.
एनर्जी कॉन्सर्व्हशन  ब्युरो, जी ऊर्जा मंत्रालयाच्या भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे या संशेद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो या पुरस्काराची हि ३३ वि आवृत्ती असून जी एम आर वरोरा एनर्जी द्वारे सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. औद्योगिक क्षेत्रात ऊर्जेचा कमीतकमी वापर ,त्या अनुषंगाने अद्यावत यंत्रणेची उभारणी , तसेच राष्ट्रीय संपदेचा कमीतकमी वापर करण्यासाठी सतत बदल व प्रयत्न करणाऱ्या औद्योगिक घटक , संस्था आणि आस्थापनांच्या प्रयत्नांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करते आणि प्रोत्साहित करते. थर्मल पॉवर प्लांट्स, ऑटोमोबाईल्स, बिल्डिंग्स, सिमेंट इत्यादी सर्व प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश असलेल्या या मालिकेची ही 33 वी आवृत्ती आहे.
या महत्त्वाच्या प्रसंगावर भाष्य करताना, श्रीनिवास बोम्मिडाला, बिझनेस चेअरमन, एनर्जी अँड इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, GMR ग्रुप म्हणाले, “भारताच्या माननीय राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून असा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करून आम्हाला उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यास प्रोत्साहन मिळते. . हा पुरस्कार अद्यावत तंत्रज्ञानाच्या  अवलंब करण्याच्या आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो ज्यामुळे आम्हाला आमची ESG उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होते, जीएमआर समूहाच्या दृष्टीकोन समाजात तसेच औद्योगिक क्षेत्रात नवीन क्रांती घडवीत आहे. .”

याप्रसंगी बोलताना, जीपीयूआयएलचे सीईओ-ऊर्जा, श्री आशिस बसू म्हणाले, “ महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त होणे ही म्हणजे औद्योगिक क्षेत्रात उत्पादनासाठी  ऊर्जेचा  निम्न स्तरावर  वापर  करून आणि उष्णतेचा दर सुधारून उत्पादन  कार्यक्षमतेत उच्च दर्जा प्राप्त करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांची साक्ष आहे. जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडने हा प्रतिष्ठित 'राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार - 2023' प्राप्त करणे  जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड यांच्या  ESG उद्दिष्टांसाठी सतत कार्य करण्यास वचनबद्धता सिद्ध करते . 
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील एकूण 102 पॉवर प्लांट सहभागी झाले होते  करत होते, त्यापैकी फक्त चार पॉवर प्लांट्सना या पुरस्काराकरिता नामांकित करण्यात आले होते  आणि GWEL प्रतहाम  विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते. GWEL मधील ऊर्जा संवर्धनाचा प्रवास 2015 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून GWEL ने अनेक पुढाकार घेतले आहेत ज्यामुळे गेल्या तीन वर्षांत 7.76 कोटी युनिट विद्युत उर्जेची आणि 2.94 लाख MCal थर्मल एनर्जीची बचत झाली आहे.
GWEL ने महाराष्ट्रातील वरोरा (चंद्रपूर  जिल्हा )येथे 600 MW (2X300 MW) कार्यरत कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाचा उभारलेला  केला आहे.  GWEL कडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) सोबत 200 MW साठी दीर्घकालीन PPA, तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन (TANGEDCO) सोबत 150 MW चा PPA आहे आणि अलीकडेच हरियाणा डिस्कॉम्सला वीज पुरवठा करण्यासाठी 150 MW PPA साठी बोली जिंकली आहे. एप्रिल 2024 पासून पुढील  पाच वर्षे हरियाणा सरकारला वीज पुरवठा करणार आहे.

Comments