वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने शिवनेरी व शिवालय या नावाने दोन चारचाकी वाहन जनसेवेकरीता लोकार्पित**शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने  शिवनेरी व शिवालय या नावाने दोन चारचाकी वाहन जनसेवेकरीता लोकार्पित*

*शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण*

चंद्रपूर/भद्रावती/वरोरा : 

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वतीने वरोरा व भद्रावती या दोन्ही तालुक्याकरीता प्रत्येकी एक चारचाकी वाहन घेण्यात आले.  वरोरा तालुक्याकरीता शिवालय या नावाने तर भद्रावती तालुक्याकरीता शिवनेरी या नावाने अशा दोन चारचाकी वाहन जनतेच्या सेवेकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या वाहनांचे लोकार्पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देसाई, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव, आमदार सुनील राऊत, मिलिंद नार्वेकर, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जयदीप पेंडके, आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोबतच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना वरोरा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत व सत्कार केला.

यावेळी युवासेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पाताई बोडके, देवेंद्र गोडबोले, जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण विशाल बरबडे, रामटेक विधानसभा प्रमुख, उपमहापौर नागपूर किशोर कुमारीया, महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे, युवती जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, तालुका प्रमुख वरोरा दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख वरोरा खेमराज कुरेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, उपजिल्हा प्रमुख मायाताई नरडे, वरोरा तालुका संघटीका सरला मालोकर, शिला आगलावे, माजी सैनिक कॅप्टन विलास देठे, माजी सैनिक विजय तेलरांधे, विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, भद्रावती तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर, वरोरा शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे, रोशन भोयर, अक्षय बंडावार ,अमोल मेश्राम, प्रफुल चावरे,पवन महाडिक आदी उपस्थित होते.


Comments