मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल"

"मामा मेलचा थरार! चंद्रपूर-मूल महामार्गावर भर दिवसा गायीची शिकार ओढत नेली, व्हिडीओ वायरल" चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर प्रसिद्ध 'मामा मेल' या वाघाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. भर दिवसा या वाघाने महामार्गावरून एका गायीची शिकार ओढत नेली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी हा धक्कादायक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. 'मामा मेल' या वाघाचा अधिवास मूल-चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरात आहे. काल आगडी भागात महामार्गाच्या बाजूला त्याने गायीची शिकार केली आणि तिच्यावर ताव मारला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी तेथे गर्दी केल्याने 'मामा मेल'ने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत नेली. या थरारक शिकारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

2023मॉर्निंग वॉक ग्रुप निवडणुकीत धनंजय पिसाळ यांचा विजयतर सचिव पदी रवी शिंदे

2023मॉर्निंग वॉक ग्रुप निवडणुकीत धनंजय पिसाळ यांचा विजय
तर सचिव पदी रवी शिंदे

चेतन लुतडे
वरोरा 

दरवर्षी डिसेंबर महिन्यात मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे अध्यक्ष व सचिव पदासाठी निवडणूक घेण्यात येते. ही संस्था वरोरा येथील जुनी संस्था असून सामाजिक व आरोग्य हिताच्या दृष्टीने काम करीत आहे. आनंद निकेतन ग्राउंड मधील रोज सकाळी फिरायला येणाऱ्या युवकांची ही संस्था असून मागील वर्षी या संस्थेचे अध्यक्ष मांडवकर हे कार्यरत होते. यावर्षी या संस्थेचे 54 सदस्य असून वरोरा शहरातील नामांकित डॉक्टर्स इंजिनियर, वकील ,पत्रकार, बिझनेस मॅन ,उन्नतशेतकरी सदस्य म्हणून कार्यरत आहे. 

यावर्षी अध्यक्ष पदासाठी धनंजय पिसाळ व दामोदर भाजपाले व सचिव पदासाठी  अनिल पाटील आणि रवी शिंदे यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये पिसाळ यांनी 34मते  घेऊन सहज विजय मिळविला. तर सचिव पदासाठी रवी शिंदे यांनी 32 मते घेऊन एकहाती विजय मिळविला. मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यात आले. विजयी उमेदवारांना शरयू हॉटेल मधून चार चाकी वाहनावर फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या उत्साहात नाचत होते. 
नवीन अध्यक्ष ने यावर्षी नवीन उपक्रम हाती घेऊन पूर्णत्वास न्यावा अशी सदस्यांनी आशा व्यक्त केली आहे.
या झालेल्या मॉर्निंग वॉक ग्रुपच्या निवडणुकीस वरोऱ्यातील नामांकित लोकांनी शुभेच्छा व्यक्त केले आहे.
निवडणुक अधिकारी म्हणून एडवोकेट मधुकर फुलझेले, पंकज नौकरकार, देवेंद्र गावंडे, बाबा आगलावे यांनी पाहिले. यानंतर विजयी उमेदवारास मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे सर्टिफिकेट देऊ सन्मान करण्यात आला.

Comments