ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल.वरोरा तालुक्यातील सलोरी येथील
वरोरा/ चेतन लूतडे/06/nov/23
वरोरा तालुक्यातील सालोरी व अर्जुनी तुकूम येथील सन 2023 मध्ये कार्यकाळ झालेल्या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण तसेच बोरगाव देशपांडे प्रभाग क्रमांक दोन मध्ये पोट निवडणूक 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आली होती. त्याचा अंतिम निकाल आज लागला आहे.
वरोरा तालुक्यातील ताडोबा लगत लागून असलेली अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून या ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्य आहे. आदिवासीबहुल लोकसंख्या असल्याने सरपंच कॅटेगिरीतील असतो. प्राण्यांचा वावर जास्त असल्याने या ठिकाणी मानव आणि जंगल प्राणी यांच्यात संघर्ष होत राहतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा विकास होऊ शकला नाही.
शिवसेना समर्थक ग्रामविकास पार्टीचे विजयी सोनू विकास हनवते 498 विरुद्ध दीपिका मडावी 297
प्रशांत श्रीरामे 230प्र
प्रकाश हनवते 140
संगीता संजय सावसाकळे264
प्रफुल दादाजी भेंडाळे 149
मेघा दत्तू कुंबरे 158
वैशाली अनिल जांभुळे बिनविरोध
माया राजेंद्र पोहीनकर. बिनविरोध
सालोरी 9+1
वरोरा पासून दहा किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायत सालोरी येथे 9 सदस्यांची ग्रामपंचायत असून अंदाजे 2000 लोकसंख्या असलेल्या या गावात आदिवासी बहुल समाज भोई, माना, एस सी, गोंड व इतर समाज आहे. मागील काळात दीपक गायकवाड हे राष्ट्रवादीचे सरपंच होते . काँग्रेसचे राजू चिकटे व मिलिंद भोयर यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा दुपट्टा प्रतिभा शिरकुरे यांच्या गळ्यात टाकण्यात आला.
तसेच बोरगाव देशपांडे येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.
Comments
Post a Comment