वाढदिवसानिमित्य खा. संजय राऊत यांचे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन* *मुंबई येथील निवासस्थानी छायाचित्रांची काष्ट प्रतिमा भेट*

*वाढदिवसानिमित्य खा. संजय राऊत यांचे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन* 

*मुंबई येथील निवासस्थानी छायाचित्रांची काष्ट प्रतिमा भेट* 

  भद्रावती / वरोरा
       शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसा- निमित्य आज दि. १५ नोव्हेंबर रोजी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी खा. संजय राऊत यांना अभिष्टचिंतना दाखल त्यांना छायाचित्रांची काष्टप्रतिमा भेट दिली. या कष्टप्रतिमात खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेचा समावेश आहे.  जेव्हा खा. संजय राऊत यांना कारागृहात जावे लागले , त्यावेळी सांत्वना दाखल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्या  मातोश्रीची भेट घेऊन त्यांचे सुध्दा आशिर्वाद घेतले, या क्षणाचे साक्षीदार असलेल्या काष्ठ छायाचित्रांचा सुध्दा यात  समावेश आहे. 
   विशेष उल्लेखनीय म्हणजे ज्यावेळी खा. सजंय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केली. त्यावेळी खा.राऊत यांनी सत्यमेव जयते... ! ही घोषणा दिली होती. अखेर न्यायालयीन सुनावणीत सत्याचा विजय होवुन दि. ९ ॲाक्टोबर २०२२ रोजी न्यायपालिकेने खा. राऊत यांना निर्दोष मुक्तता केले.
     रविंद्र शिंदे यांनी खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच खा. संजय राऊत यांचे आशिर्वाद सुध्दा  घेतले. याप्रसंगी आमदार  सुनील राऊत, भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्र प्रमुख आशीष बागवान, वरोरा विधानसभा क्षेत्र  प्रमुख रविंद्र शिंदे, वरोरा तालुका प्रमुख  दत्ता बोरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुबोध तिवारी आणि सचिन चट्टे प्रामुख्याने उपस्थित होते.
      याप्रसंगी खा. संजय राऊत यांच्या सोबत अनेक विषयांवर मनमोकळ्या चर्चा करण्यात आल्या. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दी दरम्यानचे शिवसेनेचे दिवस महाराष्ट्र राज्यात परत घेवून येण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ होवून कार्य करावे, असे आवाहन  खा. संजय राऊत यांच्या मार्फत समस्त शिवसैनिकांना करण्यात आले.

Comments