बालाजी जिनिंग भारतात कापूस गाठी पुरवणारी विश्वसनीय कंपनी ,बालाजी जिनिंग मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ

बालाजी जिनिंग भारतात कापूस गाठी पुरवणारी विश्वसनीय कंपनी

बालाजी जिनिंग मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ

चेतन लुतडे
वरोरा

दरवर्षीप्रमाणे यंदाही वरोरा तालुक्यातील कापूस खरेदीचा मुहूर्त सुरू झाला असून शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरू केली आहे. बालाजी चिनी वरोरा तालुक्यातील नागपूर रोडवर असून या ठिकाणी शेगाव, वरोरा, खांबाडा या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी येत असतो.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय देवताळे यांच्या हातून मानाची कापसाची खरेदी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्याला 7250 असा भाव देण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जयंत टेंमूर्डे, बाळू भोयर,राजू चिकटे, नितीन मत्ते, दत्ता बोरेकर, आदी सदस्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते. 
बालाजी जिनिंगचे मालक नीरजबाबू गोठी यांनी शेतकऱ्यांना यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा व्यक्त केली. 
बालाजी जिनिंग देशांमधली उत्कृष्ट कापूस गाठ पुरवणारी कंपनी असून दरवर्षी भारताच्या महत्त्वाच्या शहरामध्ये कापूस साठी पुरवण्याचा व्यवसाय ही कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून विश्वासहार्तेने काम करीत आहे.
त्यामुळे शेतकरी सुद्धा त्याच विश्वासाने कापूस विक्रीसाठी या जिनिंगला येत असतात.

कापूस खरेदीच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांना व शेतकऱ्यांना जिनिंग मालक नीरज गोठी यांनी धन्यवाद मानले आहे.
पालकमंत्री सुधीर मनगुंटीवार यांची कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीला भेट.

Comments