भाजपा गणपती सजावट स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला

भाजपा गणपती सजावट स्पर्धाचे बक्षीस वितरण थाटात पार पडले.

भाजपा नेते देवराव भोंगळे सह वरोरा भाजपा कार्यकारणी उपस्थित.

डॉक्टर सागर वजे यांच्या संकल्पनेतून गणपती सजावट स्पर्धा पार पडली.

वरोरा
चेतन लुतडे 

भारतीय जनता पार्टी शाखा वरोराच्या वतीने गणपती उत्सवात गणपती सजावट  स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये शहरातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये घरगुती गणपती सजावट आणि मोबाईल वरील रिल्स तयार करणे. याचबरोबर उत्कृष्ट मूर्तिकार अशा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भाजपा पक्षातर्फे ही आगळीवेगळी  स्पर्धा वरोरा शहरात डॉक्टर सागर वझे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली होती. वरोरा शहरातील गणपतीचे चित्रीकरण करून 7 नोव्हेंबर मंगळवारी त्याचे कार्यक्रमादरम्यान प्रसारण करून भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा चिंतामणी सभागृह येथे घेण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी भाजपाचे  नेते देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विधानसभा निवडणुक प्रमुख रमेश राजूरकर, तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुका महामंत्री ओम मांडवकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सायरा शेख, डॉ. अंकुश आगलावे, सुरेश महाजन, मधुसूदन टिपले उपस्थित होते.

प्रथम पारितोषिक *उत्कृष्ट मूर्तिकार* ,श्रुतिका कोमटी.

१)प्रथम पारितोषिक *उत्कृष्ट रील्स*  
२)आयुष आसेकर, द्वितीय नीरज चौधरी.

 *उत्कृष्ट गणपती सजावट* 
1)राहुल मेश्राम ,प्रथम पारितोषिक
2)संजय नवघरे, द्वितीय 
3)श्रेयश लोहकरे, तृतीय 
        4)कुणाल कारशेट्टीवार, चतुर्थ 
5)विवेक बोधे, पाचवे

हा कार्यक्रम डॉ. सागर वझे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला होता.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित चवले, अभय मडावी,संजय राम, सारथी ठाकुर, चेतन लुथडे, अभी गयनेवार आदिं भाजपा कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.


Comments