जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख*

*जवस उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान - नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख*

*केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत पंजाबराव कृषी महाविद्यालय अकोला यांचे मार्गदर्शनात भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर व आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जवस - सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर खेमजाई तालुका वरोरा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उद्बोधन करताना म्हणाले की चना लागवडीचा पर्याय म्हणून जवसाची लागवड शेतकऱ्यांनी करावी ज्यापासून शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळेल व या पिकावर शक्यतो रोगराई पासून दूर असणारे पीक म्हणून याचा विशेष उल्लेख केला जातो . यावेळी श्री नितीन मत्ते यांचे हस्ते शेतकऱ्यांना बियाने व निविष्ठा वाटप करण्यात आले . या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ जवस उत्पादक डॉक्टर विना नायर मॅडम या उपस्थित होत्या .यावेळी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पोतदार सर व खेमजाई गावातील शेतकरी वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Comments