मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा आरोप
PHM मेटल इंडस्ट्रीज या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी
वरोरा
तालुक्यातील मौजा फत्तापूर येथील सर्व्हे क्र. 180 वरील मुदतबाहय उत्खनन तसेच सर्व्हे क्र. 179 येथील जमीनीवर बगरपरवाना गौण खनिज उत्खनान करुन मे. पी.एच.एम मेटल इंडस्ट्रीजच्या कंपनीने शासनाचा अंदाजे 100 कोटीचा महसुल बुडविला असल्याने या प्रकरणाची तात्काळ मोका चौकशी करुन या कामात वापरण्यात आलेली वाहने जप्ती करण्यात यावे व दंडात्मक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी वरोरा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मौजा फत्तापूर, ता. वरोरा येथील सर्व्हे क्र. 180 आराजी 2.70 हे आर या खाजगी जागेमध्ये मे. पी.एच.एम मेटल इंडस्ट्रीज यांना दि. 03-05-2018 ते 02-05-2023 या मुदतीपर्यंत संदर्भात नमूद कार्यालयीन आदेश मधील अटी व शर्ती क्र. 1 ते 17 नुसार खानपटृटा मंजूर करण्यात आलेला होता तसेच सदर खानपट्याची मुदत 02-05-2023 रोजी समाप्त झालेली आहे. परंतु या ठिकाणी अजूनही उत्खनन सुरू आहे. खानपट्टा धारकाने आदेशाच्या अटी व शर्तीचे पालन न करता अवैद्यपणे क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन करुन शासनाच्या महसुलाचे आर्थीक नुकसान केलेले आहे. खानपट्टा मंजुरीची कार्यवाही ही तहसील कार्यालयाच्या स्तरावर होत असल्याने वरोरा तहसील मधील गौण खनिज निरीक्षक तसेच संबंधीत मंडळ अधिकारी, तलाठी यांनी मोका चौकशी करणे अपेक्षीत होते पंरतु तसे त्यांनी केल्याचे दिसून आले नाही .
दरम्यान प्रशासनाचा गैरफायदा घेत खानपट्टा धारक यांचे मंजूर आदेशाची मुदत संपल्यानंतर सुध्दा मोठया प्रमाणात सर्व्हे क्र. 180 वर अवैद्य उत्खनन सुरू होते. मौजा फत्तापूर, ता. वरोरा सर्व्हे क्र. 179 मध्ये कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना आता उत्खनन सुरु आहे. हे सर्व प्रकार तहसील कर्मचारी यांना माहिती असून सुध्दा ते याकडे डोळेझाक करुन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत.
ETS मोजणी करुन मे. पी.एच.एम मेटल इंडस्ट्रीज यांनी उत्खनन साठी वापरण्यात आलेले पीसी मशीन, लोडर, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सर्व ट्रक व हायवा ट्रक यावर जप्तीची कारवाई करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करून अंदाजे 100 कोटी रुपयाचा शासकिय महसुल वसुल करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांनी केली आहे.
Comments
Post a Comment