पद्दोन्नती


*वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. आयुष नोपाणी साहेब यांची नियत कालमर्यादेनुसार जालना येथे बदली झालेली आहे. ते वरोरा येथून आपला पदभार सोडून जात आहेत. त्या निमित्ताने त्यांची भेट घेवून त्यांना पुढील कारकिर्दीकरीता शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या व सोबतच त्यांनी वरोरा उपविभागात त्यांच्या कारकीर्दीदरम्यान जी उल्लेखनीय, प्रशंसनीय व निष्पक्ष कार्यप्रणाली राबविली त्याबाबत त्यांचे आभार देखील मानण्यात आले.*

*श्री. आयुष नोपाणी साहेबांन सारखे अधिकारी या विधानसभा क्षेत्राला लाभत राहो. नोपाणी साहेबांनी कोणत्याही राजकीय पक्ष, जनप्रतिनीधी, यांच्या प्रभावाखाली न येता, निष्पक्षपणे कामगिरी केली. त्यांच्या कारकीर्दीदरम्यान अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला. अवैध व्यवसायांना चोप लावण्यात आला. कुठलीही हेकेखोरी, पदाचा गैरवापर न करता विनम्रता व बुध्दीचातूर्याच्या जोरावर परिसरात शांतता व संरक्षणाचे वातावरण निर्माण करून ठेवले. नोपाणी साहेब आणखी काही वर्षे या क्षेत्रात असायला हवे होते...*


Comments