विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातुन विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यानी घ्यावा “ केंद्रीय सहसचिव श्री.आनंद पाटील यांचे आवाहन

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातुन विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यानी घ्यावा “   केंद्रीय सहसचिव श्री.आनंद पाटील यांचे आवाहन

वरोरा
चेतन लुतडे वरोरा 

                             भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने “ विकसित भारत संकल्प यात्रा ” या नावाची  देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधी आखण्यात आली आहे. विविध योजना अंतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजना बद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक कथा /अनुभव शेअरिंग द्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधने, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्याची नोंदणी करणे.  हे विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. 
पंचायत समिती वरोरा अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ दिनांक 23 नोव्हेबंर 2023 रोजी ग्रामपंचायत बोर्डा येथे करण्यात आला. सदर यात्रा पंचायत समिती वरोरा अंतर्गत 81 ग्रामपंचायत मध्ये फिरणार आहे. त्या अनुषंगाने  विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे महाराष्ट्राचे नोडल अधिकारी श्री.आनंद पाटील यांनी ग्रामपंचायत टेमुर्डा येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2023  रोजी भेट दिली. त्यांनी  विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या अंमलबजावणी बाबतचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीदरम्यान पंचायत समिती ,तहसील कार्यालय, महिला बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, नरेगा , स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, शिक्षण विभाग, कृषी विभाग, अन्न पुरवठा विभाग, मत्स्य पालन विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भुमी अभिलेख, एचपी गॅस एंजन्सी   इत्यादी विभागाचे स्टॉल  उभारण्यात आले. त्यामध्ये लाभार्थ्याची नोंदणी करून लाभार्थ्यांना लाभ दिला. यावेळी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, दीनदयाल अंतोदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधान मंत्री किसान सन्मान योजना,  किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, जलजिवन मिशन, स्वामीत्व योजना, जनधन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम योजना, नॅनो फर्टीलायझर, सिकलसेल ऍनिमिया ॲनिमेशन, मिशन एकलव्य मॉडेल निवासी शाळा, स्कॉलरशिप योजना इत्यादी योजनेची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सिकलसेल तपासणी ,रक्तदाब, मधुमेह, टीबी, यांची तपासणी करण्यात आली. 149 आयुष्यमान कार्ड व 48 आभा कार्ड काढण्यात आले. श्री आनंद पाटील यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. “  विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाने व अधिकाऱ्याने प्रामाणिक प्रयत्न करावे तसेच लाभार्थ्यांनी सुद्धा विविध विभागाशी संपर्क साधून लाभ पदरात पाडून घ्यावा “  असे आवाहन याप्रसंगी माननीय श्री आनंद पाटील यांनी केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे  प्रकल्प अधिकारी श्री मुरुगांथम यांनी आदिवासींच्या विविध योजनेबाबत माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपुर  श्रीमती मीना साळुंखे यांनी ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती वरोराचे गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर सावसाकडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री गोपाल गुडधे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नरेंद्र पेटकर कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांनी केले. सदर आढावा सभेला वरोराचे  तहसीलदार श्री योगेश कौटकर, तालुका कृषी अधिकारी श्री लवटे ,तालुका भूमि अभिलेख उपअधिक्षक  श्री.हुलके, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्री. राजकुमार हिवारे, जिल्हा आरोग्य अधिकारी , ग्रामपंचायत टेमुर्डाचे सरपंच श्रीमती सुचिता ठाकरे, ग्रामविकास अधिकारी श्री.बोरचाटे तसेच विविध विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत टेमुर्डाचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेव,  गावातील  नागरिक, लाभार्थी  उपस्थित होते.

          

Comments