वरोरा येथे भव्य विदर्भस्तरिय क्रिकेट सामन्याचे विलास नेरकर यांचा हस्ते उद्घाटन*.

*वरोरा येथे भव्य विदर्भस्तरिय क्रिकेट सामन्याचे विलास नेरकर यांचा हस्ते उद्घाटन*.      
     
वरोरा 
   जय जिजाऊ क्रिकेट मंडळ वरोरा तर्फे खेकारे लेआऊट जिजामाता वार्ड वरोरा येथे विदर्भस्तरिय हाप पिच टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असता कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ. पिंपळकर ताई माजी नगरसेविका न.प.वरोरा उद्घाटक मा. श्री विलासराव नेरकर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा, प्रमुख पाहुणे मा.अनिल झोटींग माजी उपाध्यक्ष न.प.वरोरा मा. श्री चंद्रकांत कुंभारे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा, मा. डॉ. नितीन पाटील अध्यक्ष जय जिजाऊ क्रिकेट मंडळ वरोरा मान्यवर पाहुणे मंडळींनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून क्रिकेट पिच चे रितसर रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाहुणे मंडळींनी क्रिकेट खेळुन आनंद घेतला. तसेच मा. पिंपळकर ताई, मा.विलासराव नेरकर, मा.चंद्रकांत कुंभारे यांनी याप्रसंगी सर्व खेळाडूंना व जनसमुदायाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित मांडवकर यांनी केले. या प्रसंगी वार्डातील मंडळी व बाहेर गाव वरून आलेले क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

Comments