बनावट दारू विकाल तर तुरुंगात जाल ।

बनावट दारू विकाल तर तुरुंगात जाल ।

वरोरा
चेतन लुतडे

दि. २४/११/२०२३ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी वरोरा येथील आनंदवन चौकात १) अनिलसिंग अदबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व २) आशिष पुरुषोत्तम मडावी या आरोपीकडून बनावट दारू जप्त केली होती. आरोपींना मा. न्यायालयाने दि. २७/११/२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी दिली होती. श्री. सचिन पोलेवार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी तपास करून आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायालय,वरोरा येथे पुन्हा हजर केले असता आरोपींना जामीन मंजूर न होता आरोपीची थेट तुरुंगात / कारागृहात रवानगी करण्यात आली.
         या गुन्हयाच्या अनुषंगाने काही महत्वपुर्ण माहिती विभागाच्या हाती लागली असून काही संशयितांच्या हालचालींवर राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवून आहे. लोकांच्या जिवीताशी खेळून बनावट दारू व्यावसाय  करणा-यांविरूध्द सक्त कारवाई करण्याचा इशारा श्री.विकास थोरात ,निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,वरोरा यांनी दिला.
बनावट दारू विक्रीस येत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा यास खबर दिल्यास गुप्त  ठेवण्याचा विश्वास सुद्धा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Comments