वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात संविधान उद्देशिकेचे ठिकठिकाणी वितरण व सामूहिक वाचन* *शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेचा उपक्रम उपक्रम*
*वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात संविधान उद्देशिकेचे ठिकठिकाणी वितरण व सामूहिक वाचन*
*शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेचा उपक्रम उपक्रम*
वरोरा /भद्रावती
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा -युवती सेनेच्या वतीने वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे ठिकठिकाणी वितरण व सामुहिक वाचन करण्यात आले.
सदर उपक्रम शिवसेनेचे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र शिंदे, जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर आणि भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वते यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला.
युवती सेनेच्या प्रा. प्रिती पोहाणे यांच्या संयोजनात वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय, सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, विविध प्रतिष्ठाने आणि घरोघरी भारतीय संविधान उद्देशिकेचे वितरण व सामुहिक वाचन करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवा सेना जिल्हा अधिकारी मनीष जेठाणी,येशू आर्गी, उपजिल्हा युवा अधिकारी शरद पुरी, शिव गुडमल, विधानसभा युवा अधिकारी अभिजीत कुडे, विधानसभा चिटणीस उमेश काकडे, तालुका युवा अधिकारी विक्की तावाडे, तालुका युवा अधिकारी राहुल मालेकर, शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे, शहर युवा अधिकारी मनोज पापडे आणि आणि युवा -युवती सेनेच्या इतर कार्यकर्त्या बंधू - भगिनींनी सहकार्य केले, असे सोशल मीडिया समन्वयक गोपाल सातपुते यांनी कळविले आहेत .
Comments
Post a Comment