इनरव्हील क्लब तर्फे वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन

इनरव्हील क्लब तर्फे वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन

वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा येथील इनरव्हील क्लब च्या वतीने वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन बाबूलाल फूड प्लाझा येथे करण्यात आले. क्लबच्या अध्यक्ष वैशाली चहारे सचिव प्रतिभा मणियार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

दरवर्षी इनरव्हील क्लब तर्फे जिल्हा आढावा बैठक घेऊन  कामाचा वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. हा अहवाल
डीसी शीला देशमुख  यांना सादर करावा लागतो. त्यानुसार पुढील कार्याची रूपरेषा आखली जाते.
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच वरिष्ठांच्या आदेशाने आय कॅम्प  घेण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्याचबरोबर
पाच ते दहा वर्गातल्या मुलांचा डान्स स्पर्धाचे आयोजन रोटरी क्लब उत्सवात करण्यात आले आहे.
तालुक्यातील गरजू रुग्णांचे डोळे तपासून  त्यांच्या ऑपरेशनची मदत करण्यासाठी निधी गोळा करण्यात आला आहे.
डॉक्टर पूज्या पिसे वरोरा. यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील मोरवा या गावात आय कॅम्प घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे डीसी. शीला देशमुख, एजी. दादा जयस्वाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर सागर वझे, रोट्रॅक सेक्रेटरी हिमांशू केशवानी, इनर विल सदस्य अध्यक्ष वैशाली सहारे, उपाध्यक्ष कविता बाहेती, सचिव प्रतिभा मणियार, आय एस ओ पूजा मुंदडा, ट्रेझरर झेनब सीद्दीकोट, सी सी प्राजक्ता कोहळे, इनरव्हील सदस्य मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते.

Comments