प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा शहरात रोटरी उत्सवाचे आयोजन विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल

वरोरा शहरात रोटरी उत्सवाचे आयोजन
  विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल

वरोरा दि 22 नोव्हेंबर
       रोटरी क्लब च्या वतीने दरवर्षी रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे
        या उत्सवाचे 24 तारखेला उद्घाटन होणार असून याप्रसंगी कन्यका नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय आईंचवर तसेच रोटरीचे उपप्रांतपाल नितेश जयस्वाल,  एक्सलंट अकॅडमी चे संचालक प्रा अभय टोंगे आणि आनंदवन येथील मूक बधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार आहे.
        रोटरी उत्सवाचे हे आठवे वर्ष असून एक लाख पन्नास हजार वर्ग फुटामध्ये हा भव्य उत्सव आयोजित केलेला आहे. यामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल,  विविध कंपन्यांचे नवनवीन उत्पादने यांची विशाल प्रदर्शनी,  परिवाराला आकर्षित करणारे मनोरंजन पार्क, गायन, नृत्य,  रील आदी स्पर्धा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य राहणार आहे. दरवर्षी सुमारे एक लाख  भेट देतात पंजाबी आणि गुजराती खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह एकूण या उत्सवामध्ये राहणार आहेत. महिला सशक्तिकरनाला प्राधान्य देत काही स्टॉल महिलांकरता मोफत देण्याचे आयोजकांनी ठरविले आहे.  तसेच वरोरा शहरातील पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पास वितरण करण्यात येणार आहे.
      या प्रसंगी शहरातील विविध सामाजिक,  सांस्कृतिक व क्रीडा संघटनांचा सत्कार करणार करण्यात येणार असून सामूहिक तुळशी विवाह सोहळा या उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत उपस्थित रोटरीचे अध्यक्ष डॉ. सागर वझे, सचिव ऍड मधुकर फुलझेले तसेच रोटरीचे पदाधिकारी हुजैफा अली, नितेश जयस्वाल,  समीर बारई,  योगेश डोंगरवार पराग पत्तीवार ,  हिरालाल बघेले, बंडू देऊळकर, मनोज कोहळे, सचिन जिवतोडे, आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाधिक संख्येने या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments