देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

वरोरा
चेतन लुतडे

भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत देऊळवाडा गावांमध्ये अचानकपणे बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
देऊळवाडा हे गाव विजासन जवळ असून या टेकड्यांमध्ये पोलिसांची फायरिंग नेहमी होत असते. हा त्यांचा कवायतीचा भाग असतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही कवा आहेत या ठिकाणी केली जाते. परंतु विजासन या टेकडी पासून देऊळवाडा हे गाव दोन ते अडीच किलोमीटरवर आहे. या ठिकाणची गाव वस्ती बरीच मोठी असून या ठिकाणी कच्चे घरे बनलेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कवायती दरम्यान बंदुकीची गोळी येण्याचा त्रास बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी हा त्रास सुरूच आहे. 
पोलिसांनी बंदूकीची गोळी गावातून हस्तगत केली असून ही गोळी जशीच्या तशीच होती. त्यामुळे ही गोळी नेमकी कुठून आली याचा तपास पोलीस निरीक्षक इंगळे  घेत आहे. 

मात्र हा वारंवारचा प्रकार असून गावामध्ये बंदुकीच्या गोळीने गावकरी दगावल्यास  पोलीस प्रशासन जबाबदार राहतील काय असा अहवाल गावकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे देऊळवाडा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments