एक दिवा प्रकाशाचा दिवाळीनिमित्त अभिनव उपक्रम

एक दिवा प्रकाशाचा दिवाळीनिमित्त अभिनव उपक्रम

चेतन लुतडे
वरोरा

दिवाळी सणाच्या धनत्रयोदशीच्या सकाळी सामाजिक कार्यकर्ता बंडू देऊळकर यांनी एक दिवा प्रकाशाचा या अभिनव उपक्रमाची सुरुवात करून दिवाळी साजरी केली.


वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू देऊळकर यांच्या अभिनव उपक्रमाने समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना दिवाळीच्या सणानिमित्त भेटवस्तू व मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. बंडू देऊळकर हार्डवेअर व पेंट व्यवसायिक असून वर्षभरात दुकानात पेंटर व मजूर त्यांच्या दुकानाशी निगडित असतात त्यामुळे अशा घटकांकडे लक्ष देत यावर्षीची दिवाळी वरोरा शहरातील पेंटर व दिवाळीसाठी घरे पेंट करणारे मजूर व त्या संबंधित असणारे गरीब घटक यांच्यासोबत धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांना भेटवस्तू व मिठाई देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 आज त्यांचा वाढदिवस असून दिवाळीची सुरुवात आहे त्यामुळे दरवर्षी ते आपल्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम राबवीत यावर्षी त्यांनी दिवाळीला घरे पेंट करणारी मजूर दिवाळीनिमित्त कुंभार मोहल्यातील दिवलनी विक्रेते अशा अनेक गरजवंत लोकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या अभिनव उपक्रमाला  आनंदवन मित्र मंडळाचे सदस्य तथा मॉर्निंग ग्रुपचे व रोटरी क्लबचे सदस्य  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments