नवसाला पावलेल्या उखर्डा ते नागरी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे**पाहणी करायला आलेले बांधकाम अभियंता झोपेत आहेत काय? विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा सवाल*

*नवसाला पावलेल्या उखर्डा ते नागरी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे*

*पाहणी करायला आलेले बांधकाम अभियंता झोपेत आहेत काय? विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा सवाल*
वरोरा:-  तालुक्यातील उखर्डा ते नागरी रस्त्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवासेना कुडे यांच्या नेतृत्वात अनेकदा आंदोलने करण्यात आली. त्याचे फलीत बांधकाम विभागाला उशीरा का नको पण जाग आली व  उखर्डा ते नागरी रत्याचे बांधकाम सुरु करण्यात आले.
सतत पाठपुरावा केल्यावर खुप दिवसांच्या प्र्रतिक्षेनंतर या 3 किलोमीटर रस्त्याचे नुकतेच काम सुरू झाले. आता चांगला रस्ता मिळेल या आशेवर गावकऱ्यांनमध्ये आनंद बघायला मिळाला. परंतु पाहणी केली असता रस्त्याचे काम हे एकदम निकृष्ठ दर्जाचे दिसून येत आहे. कुठे गिट्टी व्यवस्थीत नाही, डांबराचा पत्ता नाही, वरुन थातुरमातुर लिपापोती करुन नवरीचे मेकअप केल्यासारखे रस्ता सुंदर दाखविण्याचे प्रयत्न बांधकाम विभाग व ठेकेदार करीत आहेत. रस्त्याचे काम पुर्ण होण्याआधीच ठोकळ गिट्टी बाहेर वर निघालेली आढळून येत आहे.
आता नागरीकही रस्त्याचे काम बघुन हैराण झालेले आहे. डांबर कुणी खाल्ल काय? गिट्टी कुणाच्या घश्यात गेली असेल? कोण आपले घर भरताय, ठेकेदार की बांधकाम विभाग असे अनेक प्रश्न गावकऱ्याना पडलाय. पाहणी करायला आलेले अधिकारी  झोपेत होते काय? असा सवाल विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी उपस्थिती केला आहे.
उपविभागीय बांधकाम अभियंता काम बघून गेले पाहणी करून गेले त्यांना त्रुटी दिसल्या नाही काय? असा सवाल अभिजित कुडे यांनी केला आहे. कामात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ठ निदर्शनास येत आहे. खुप आंदोलने, पाठपुरावा व संघर्ष नंतर काम मंजूर झाले पण काम निकृष्ठ दर्जाहीन होत असेल तर शांत बसणार नाही. तात्काळ कामाचा दर्जा सुधारुन करावा, डांबर प्रमाणात टाकून रस्ता शासकिय नियमास धरुन दर्जेदार रस्ता तयार करावे, बांधकाम अभियंता यांनी तात्काळ दखल घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे तसेच तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैनिक आक्रमक भूमिका घेतील असा निर्वानीचा इशारा युवासैनिकानी दिलेला आहे.

Comments