*वरोड्यात भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड**हिंदू समाजात संताप व्यक्त होत आहे संताप**24 तासात आरोपीला अटक करण्याची मागणी* *अन्यथा आंदोलन करणार*

*वरोड्यात भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड*
*हिंदू समाजात संताप व्यक्त होत आहे संताप*

*24 तासात आरोपीला अटक करण्याची मागणी* 
*अन्यथा आंदोलन करणार* 
वरोडा : शाम ठेंगडी

        वरोडा शहरात भगवान श्री शंकराच्या मूर्तीची विटंबना करून मूर्तीची तोडफोड झाल्याची घटना आज 13 नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी उघडकीस आल्याने शहरातील हिंदू समाजात चीड व्यक्त केल्या जात आहे.
 मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना  येत्या 24 तासात अटक करण्यात यावी अन्यथा हिंदू समाजातर्फे आंदोलनात्मक पवित्रा उचलल्या जाईल अशा  इशारा आज हिंदू संघटनांनी घेतलेल्या सभेतून पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.
            येथील वणी बायपास वरील उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत भगवान श्री शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. परंतु आज सकाळी काही व्यक्तींना या मूर्तीची तोडफोड करून विटंबना झाल्याचे दिसून आले. मूर्तीचा एक हात व डोक्यामागील  भाग हा क्षतिग्रस्त करण्यात आला असून नाकावरही तोडफोड झाल्याचे दिसून आले आहे.
        या घटनेची माहिती शहरात पसरताच संपूर्ण हिंदू समाजात संताप व्यक्त करत अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
     या घटनेचे पडसाद उमटत नऊ ते दहा हिंदू संघटनानी एकत्र येत येथील श्रीराम मंदिरात दुपारी एक बैठक घेतली. या बैठकीत शहरात गेल्या दोन वर्षात अशा प्रकारे घडलेली ही तिसरी घटना असल्याचे नमूद करत यापूर्वी भाजी बाजारातील भगवान शंकराचीच मूर्तीची विटंबना करण्यात आली होती.या घटनेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीस नंतर सोडून दिले होते.
      आजच्या घटनेत अशा प्रकारची पुनरावृत्ती न होता मूर्तीची विटंबना व तोडफोड करणाऱ्या व्यक्तीस येत्या 24 तासात पोलिसांनी योग्य कारवाई करून अटक करावी व समस्त हिंदू समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
       हिंदूंची ही मागणी पूर्ण न झाल्यास  हिंदू समाजातर्फे आंदोलन उभारण्याचा इशारा या ९ ते १० संघटनांनी येथील पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
       ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मूर्ती कपड्याने झाकून  ठेवली आहे. शहरात वारंवार घडणाऱ्या यासारख्या घटनेच्या मागे  कोणती एखादी शक्ती किंवा षडयंत्र तर नाही ना ज्यामुळे शहरातील सामाजिक सौंदर्य बिघडण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी शंका या बैठकीत व्यक्त करण्यात आले. बैठकीला हिंदू समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments