वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर

वरोरा तालुक्यातील सालोरी व अर्जुनी ग्रामपंचायतची निवडणूक, तर एका ग्रामपंचायत मध्ये पोट निवडणूक 


वरोरा/ चेतन लूतडे/13/10/23

वरोरा तालुक्यातील सालोरी व अर्जुनी तुकूम येथील सन 2023 मध्ये कार्यकाळ झालेल्या दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण तसेच बोरगाव देशपांडे प्रभाग क्रमांक दोन मध्ये पोट निवडणूक 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहे.


अर्जुनी तुकूम  7+1

वरोरा तालुक्यातील ताडोबा लगत लागून असलेली अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून या ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्य  आहे. गावात अंदाजे 350घरे असून गावाचे सरपंच यामिनी बोधले ह्या काँग्रेसच्या  2023 पर्यंत सरपंच होत्या.  त्यांची 4/3 अशी सत्ता होती. या गावांमध्ये आदिवासीबहुल लोकसंख्या असल्याने सरपंच कॅटेगिरीतील असतो. प्राण्यांचा वावर जास्त असल्याने या ठिकाणी मानव आणि जंगल प्राणी यांच्यात संघर्ष होत राहतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा विकास होऊ शकला नाही. जवळ असणारे ग्रामपंचायत चारगाव खुर्द काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामपंचायतीवर आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे निकटवर्ती सरपंच राजू चिकटे यांचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे येणार्या निवडणुकीत हे कोणत्या पक्षाकडे जाईल हे  सांगता येत नाही.


सालोरी 9+1

वरोरा पासून दहा किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायत सालोरी येथे 9 सदस्यांची ग्रामपंचायत असून अंदाजे 2000 लोकसंख्या असलेल्या या गावात आदिवासी बहुल समाज भोई, माना, एस सी, गोंड व इतर समाज आहे. मागील काळात दीपक गायकवाड हे राष्ट्रवादीचे सरपंच होते . यानंतर या गावात विकास झाला नसून गावकऱ्यांनी यावर्षी सत्तापालट करण्याचे संकेत दिले आहे. बीजेपी चे शंकर बावणे ,कवडू वाघ यांना येथे चांगली संधी आहे. पार्वताताई ढोक पंचायत समिती सदस्य असल्याने या गावात त्यांचे वर्चस्व वाढले आहे. नवीन युवक ग्रामपंचायत सलोरीवर झेंडा फडकवताना दिसेल.

 ग्रामपंचायत आरक्षण सोडत सरपंच पदासाठी जनतेमधून निवडून देणे आहे.

 तसेच बोरगाव देशपांडे येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी 16 ते 20 तारखेपर्यंत फार्म भरवाची मुदत तर फार्म उचलण्याची, चिन्ह देण्याची तारीख 25 ऑक्टोंबर दिली असून, ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण स्त्री,, प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री, याप्रमाणे असणार असून सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती स्त्री चे आरक्षण सोडण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायत सालोरी येथे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती याप्रमाणे असून सरपंच पदाकरिता सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण सोडण्यात आलेले आहे.


ही निवडणूक जरी छोटी वाटत असली तरी महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडींचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिसणार हे नक्की.

या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि काँग्रेस आपली दावेदारी दाखवत असले तरी प्रत्यक्षात गावकरी आपल्या गटामध्ये ही निवडणूक लढतात.






Comments