वरोरा बाजार समितीत सोयाबीनचा खरेदी लिलाव सुरूसोयाबीनला ४६०० तर कापसाला ७०३१ रुपये भाव

वरोरा बाजार समितीत सोयाबीनचा   खरेदी  लिलाव सुरू
सोयाबीनला ४६००  तर कापसाला ७०३१ रुपये भाव

      Happy birthday Dr. Vivek tela 

वरोरा तालुका प्रतिनिधी) --कृषी उत्पन्न बाजार समिती मोहबाळा रोडवरील राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये मागील चार दिवसापासून सोयाबीन खरेदीच्या खुला लिलाव सुरू झाला असून  यावर्षी सोयाबीनला ४६०० रुपये भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे .
  आज सुद्धा कापसाचा लिलाव सुरू झाला असून प्रति क्विंटल ७३१ रुपये भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे.
  आज राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजयराव देवतळे व उपसभापति  जयंत टेमुर्डे यांच्या हस्ते कापूस खरेदीच्या शुभारंभ करण्यात आला असून यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळूभाऊ भोयर, दत्ता बोरेकर ,प्रवीण मालू तसेच सचिव चंद्रसेन शिंदे केंद्रप्रमुख सचिन डहालकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते. आजची खरेदी स्वामी कॉटनचे मालक छल्लानि व आशिष मोरे यांनी  केली असून ७०३१ रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव देण्यात आला असून यावेळी शेतकऱ्याचा  सत्कार करण्यात आला.
    मागील काही वर्षांपासून राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन व कापसाचा लिलाव पद्धतीने खरेदी बंद होती मात्र यावर्षी नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळाने ठराव घेऊन व संचालक मंडळाने व्यापाऱ्यांची बैठक घेऊन यावर्षी राजीव गांधी मार्केट यार्ड वरोरा, खांबाडा, शेगाव व माढेळी या  उपकेंद्रात लिलाव पद्धतीने शेतमाल व्यापाऱ्यांनी खरेदी करावा व शेतकऱ्यांना इतर मार्केट प्रमाणे चांगला भाव  शेतकऱ्यांना कसा देता येईल याबाबत प्रयत्न करावे असे ठरले.
    त्यानुसार१६ऑक्टोंबर पासून राजीव गांधी मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन खरेदी सुरू झाली असून शेतमालाचा दर्जा मध्यम असल्याने सुमारे सोयाबीनला सुमारे ४०० ते४६००दरम्यान भाव मिळालेला आहे .सोयाबीन खरेदीसाठी शहरातील तसेच बाहेर गावातील व्यापारी सुद्धा खरेदीसाठी सहभाग दर्शवित आहे.

कापूस खरेदी जाहिर लिलावाद्वारे वरोरा बाजार समितीमध्ये मिळणार शेतकऱ्यांना अधिक दर- डॉ. देवतळे
वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा निर्णय
    कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत मुख्यबाजार राजीव गांधी मार्केट व व उपबाजार आवार माढेली  येथे कापूस गाड्यांची आवक बोलावून त्याच ठिकाणी जाहिर लिलावाव्दारे कापसाचे व्यवहार सुरू करण्याचा निर्णय शेतकऱ्यांचे मागणीनुसार वरोरा बाजार समितीने घेतला असून, येत्या हंगामापासून शेतकरी आपली वाहने कापूस जिनिंगमध्ये न
घेवून जाता, अगोदर राजीव गांधी मार्केट किंवा  सर्व उपबाजार आवार  येथे आणाव्यात. मुख्य व उपबाजार आवारात कापसाच्या वाहनामध्येच लिलाव करण्यात येईल. व जो व्यापारी जास्तीत जास्त बोली लावेल त्या व्यापाल्यांचे नावे सौदा लिलाव पट्टी करून देण्यात येईल. त्यानंतर ज्या व्यापाऱ्याचे नावे लिलावपट्टी असेल त्यांचे जिनिंग मध्ये कापूस खाली करून घेण्यात येईल. कापूस खरेदी केल्यानंतर हिशोब पट्टी तयार करून कापसाचे पेमेंट शेतकऱ्याच्या बँक खात्यात  किंवा नगदी तात्काळ खरेदीदार  किंवा व्यापाच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
    सदर व्यवहारामध्ये अडत्यांचे कमीशन नसल्यामुळे लिलावाव्दारे शेतकन्यांना स्पर्धात्मक अधिक दर मिळतील व ईतर बाजार समितीपेक्षा अधिक दर वरोरा बाजार समितीमध्ये मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला कापूस  लिलावद्वारे विक्री करण्यासाठी वरोरा बाजार समितीमध्ये आणावा व वाहन चालकाच्या मनाने कोठेही बाहेर कापूस विक्रीसाठी घेवून जावू नये व वाहन चालकाना मामूल देण्या घेण्याचा आग्रह शेतकन्यांनी व्यापाऱ्यांकडे करू नये  व व्यापाऱ्यांनी सुद्धा वाहन चालकांना मामुल न देता जास्तीचा भाव शेतकऱ्यांना द्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती वरोराचे सभापती डॉ. विजय रा. देवतळे, उपसभापती जयंत मो. टेमुर्डे व बाजार समितीचे सचिव  चंद्रसेन सा शिंदे व सर्व संचालक यांनी केले आहे.
.  Happy birthday 🎂 Dr. Vivek tela

Comments