तीन वर्षासाठी वाघनखे भारतात येणार. सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्यावाघनखे हिंदवी स्वराज्याचे प्रतीक

तीन वर्षासाठी वाघनखे भारतात येणार. सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

वाघनखे हिंदवी स्वराज्याचे प्रतीक

वरोरा
चेतन लूतडे वरोरा 

ज्या वाघनखाने क्रूर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. अशा हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेले वाघनखे भारतात परत आणण्यासाठी इंग्लंड येथील विक्टोरिया म्युझियम मध्ये सामंजस्य करार होऊन तीन वर्षासाठी ती वाघनखे  भारतात परत येत असल्याची वार्ता पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी सांगितल्याने स्थानीय भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरून आला.

मागील काही दिवसापासून वाघनखे परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आगामी तीन वर्षासाठी ही वागणके भारतात आणली जाणार आहेत असे असले तरी ती वागणखे कायमस्वरूपी भारतात राहावी या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळेस वरोरा येथील रत्नमाला चौक येथे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी औक्षवंत करून पालकमंत्र्यांचे स्वागत केले.यावेळी भाजपा पक्षातर्फे त्यांचा शाल व श्रीफळ फळ , ग्रामगीता, व तुकडोजी महाराजांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळेस बोलताना नामदार मुनगंटीवार पुढे म्हणाले वाघनखा नंतर जगदंबा तलवार देखील भारतात परत आणण्यासाठी यशस्वी होऊ असा विश्वास यावेळी व्यक्त केला. 

यावेळी वरोरा येथील भाजपचे रमेश राजूरकर, एहेतेशाम अली, बाबा भागडे, राजू दोडके, करण देवतळे, डॉ.सागर वझे, अंकुश आगलावे, सुरेश महाजन, गुणानंद दुर्गे, शुभम चांभारे, नरेंद्र जिवतोडे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.


Comments