कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार

  कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार बातमी:warora वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे राहणारे नरेंद लटारी थेरे (वय 40, ड्रायव्हर) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे की, त्यांच्या पुतण्या प्रज्वल प्रमोद थेरे याने एक वर्षापूर्वी उसने घेतलेले 10,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. नरेंद यांच्या म्हणण्यानुसार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावाच्या नंदोरी येथील घरी गेले असता, त्यांनी पुतण्याकडे पैसे परत मागितले. त्यावरून भांडण झाले आणि प्रज्वलने लाकडी काठी आणून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, मांडीवर व हातावर प्रहार केले. दरम्यान, भाऊ आणि वहिनीने हस्तक्षेप करून काठी हिसकावून घेतली. मात्र, प्रज्वलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नरेंद यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .................

वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी*

*वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी*

*तमाम शिवप्रेमींसाठी, ऐतिहासिक क्षण : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे*

*शिवबाच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान : ना. सुधीर मुनगंटीवार*

 

Comments