अखंड भारतासाठी राष्ट्रचेतना जागृत करणे गरजेचे : वंदना एंगलवार* राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात प्रतिपादन

*अखंड भारतासाठी राष्ट्रचेतना जागृत करणे गरजेचे : वंदना एंगलवार* 


 राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात प्रतिपादन

वरोडा 
शाम ठेंगडी

      स्त्री शक्तीला डोळ्याआड करून चालणार नाही हे  इतिहासासोबत वर्तमानानेही सिद्ध केले आहे.समितीच्या स्थापनेमुळे समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असला तरी संघटन  हाच आपल्या कार्याचा आत्मा आहे. कार्यतत्परता व आपल्या कार्यावर निष्ठा असेल तर राष्ट्रनिर्माणाचे कार्य अव्याहतपणे सुरूच राहील यात शंका नाही.समरसता, सर्वसमावेशकता आणि लवचिकतेची गरज संस्कृती संरक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचेही मत राष्ट्र सेविका समितीच्या जिल्हा बौद्धिक प्रमुख वंदना एंगलवार यांनी वरोडा येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 
 
वरोडा येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात २९ ऑक्टोबर रोज रविवारला झालेल्या राष्ट्रसेविका
                                                                                         समितीच्या  विजयादशमी  उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून त्या मार्गदर्शन करीत होत्या.
      यावेळी व्यासपीठावर गायत्री खट्टी व ज्येष्ठ स्वयंसेवी का इंद्रायणी घुडे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
          विरोधी शक्तीचे खंडन करण्यासाठी आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणेही काळाची गरज आहे.अखंड भारतासाठी राष्ट्र चेतना जागृत करणे हाच उत्तम उपाय असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, अखंड भारतासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अखंड भारताच्या प्राप्तीने होणारे लाभ या विषयावर ही त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
       देशाच्या प्रत्येक राज्यातील संस्कृती भिन्नभिन्न असली तरी देशाची संस्कृती मात्र एकच आहे. सर्वांना सामावून घेणे हीच आपली संस्कृती आहे . विभाजनाने देशाला स्वातंत्र्य मिळाले . हा खंडित झालेला भारत अखंडित होईल काय या प्रश्नाचे उत्तर होईल हेच आहे.मात्र यासाठी राष्ट्रीय भावना बाळगून सर्वांना एकत्रितपणे कार्य करावे लागेल असे मत या प्रसंगी  वरोड्याच्या  गायत्री खटी यांनी व्यक्त करत संघटनाचे महत्त्व आणि महिला सबलीकरणासाठी संघटनेची आवश्यकता विशद केली.त्यासाठी विविध उदाहरणे देऊन त्यांनी महिला संघटनाच्या शक्तीवर आपले चिंतन प्रकट केले.

      या कार्यक्रमाला  शहरातील सन्माननीय गण, समितीच्या सर्व जेष्ठ तरुण आणि बालसेविका उपस्थित होत्या. उत्सवात ध्वजारोहणानंतर शस्त्रपूजन आणि भारत माता,मावशी केळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.समिती प्रार्थनेनंतर सेविकांनी "आवाहन हे ज्योतींना" या गीतावर सेविकांनी केलेले योगचाप हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.विष्णू अष्टकावरील टिपरी योग,तालयोग, व्यायामयोग अशी शारीरिक प्रात्यक्षिके सेवकांनी सादर केली. 
       डॉ. पल्लवी ताजने यांनी प्रास्ताविक तर  नगरकार्यवाहीका अपूर्वा बुजोणे यांनी पाहुण्यांचा परिचय व आणि इंद्रायणी घुडे यांनी ऋणनिर्देश यांनी केले," खड़गधारिणी तुम्हे देत मानवंदना " हे वैयक्तिक गीत स्नेहा जवदंड यांनी सादर केले.  श्रद्धा भोम्बे यांनी गायलेले " सह्याद्री के कण कण से, गुंज उठा जयजयकार " हे सांघिक गीत  स्वयंसेविकेनी सादर केले. यावेळी रश्मी राखे यांनी अमृतवचन तर प्रतिमा देशपांडे यांनी सुभाषित  सादर केले. डॉक्टर जयश्री शास्त्री यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. क्षमा योगी, नीता दुर्गपुरोहीत अंजली शिंगरू यांचेसह अनेक सेविकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
    सामूहिक वंदेमातरमने कार्यक्रमाचे सांगता झाली.

Comments