टेंमुर्डा येथील एटीएम फोडनारे चोर पोलिसांच्या ताब्यात.टेंमुर्डा  येथील एटीएम फोडनारे चोर  पोलिसांच्या ताब्यात.

वरोरा पोलिसांचे यश, बारा तासात आरोपीला अटक

जनतेने सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या कार्यालयासमोर किंवा घरासमोर लावावेत.

वरोरा
चेतन लूतडे

पोलीस स्टेशन अंतर्गत टेंमुर्डा येथील चौकी अंतर्गत  ,वरोरा येथे दिनांक 20/10/2023 रोजी तक्रारदार  सिद्धांत संजय • नगराळे वय 30 वर्ष शाखा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्रा, शाखा टेमुर्डा ह्यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तोंडी रिपोर्ट दिला होती.  टेमुर्डा येथिल बँकेचे ए. टी. एम. दिनांक 20/10/2023 वे रात्रौ 02/45 वा. ते 03/15 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने ए. टी. एम. मधील सिसिटीव्ही कॅमे-याचे व सायरनचे वायर कापुन ए.टी.एम. मधील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून  पो.स्टे. वरोरा येथे अप. क्र. 849/2023 कलम 379, 511 भा.द.वी. वा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाची माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळा वरील व विविध ठिकानाचे सिसिटीव्ही फुटेज तपासनी केले. चारचाकी तवेरा वाहन क्रमांक MH 31 EK 4214 असा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाल्याने सदर वाहनावरून मनीष अमर पाल रा. रेवना ता. जि. घाटमपुर (उत्तरप्रदेश) हल्ली मुक्काम ,अवदुत नगर मानेवाडा नागपुर येथून आरोपीस  ताब्यात घेवुन त्याचे कडे सखोल चौकशी केली असता सदर तवेरा वाहनाने नागपुर वरुन तो व त्याचा नातेवाईक  अंकित उर्फ कुलदिप अरविंद पाल वय 20 वर्ष रा. अल्दा महेशगंज ता. मोराव जि. अलाहाबाद (उत्तरप्रदेश) असे दोघे मिळुन सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेले तवेरा वाहन, मोबाईल व गुन्हात वापरलेले साहीत्य असा एकुन 7,20.000/- रु. वा माल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी क्र. (1) मनीष अमर पाल रा. रेवना घाला पोलीसांनी सिसिटीव्ही आधारे कौशल्यपूर्व तपास करुन दिनांक 20/10/2023 रोजी अटक केली असुन आरोपी क्र. (2) अंकित उर्फ कुलदिप अरविंद पाल वय 20 वर्ष रा. अल्दा महेशगंज ता. मोराव जि. अलाहाबाद (उत्तरप्रदेश) हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.

सदरची कारवाई मा. रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. आयुश नोपानी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा तसेच मा. अमोल काचोरे पोलीस निरीक्षक पो. स्टे. वरोरा ह्यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि दिपक ठाकरे, किशोर मितरवार पोहवा दिपक दुधे, दिलीप सुर नापोअ. अमोल घढरे, किशोर बोढे पो. अं. दिनेश मेश्राम, संदिप मुळे, सुरज मेश्राम, फुलचंद लोधी ह्यांनी अथक परिश्रम घेवुन अवघ्या 12 तासात सदरचा गुन्हा उघड केला.
 *वरोरा पोलीस ठाणेदार* 
   _अमोल काचोरे_ 
*परिसरातील जनतेला पोलीस स्टेशन वरोरा कडुन आव्हान करण्यात येते की, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्या करीता जास्तीत जास्त जनतेनी त्यांचे कार्यालयात तसेच राहते घरी सिसिटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावे. जने करुन पोलीसांना गुन्हयाची उकल करण्यास मदत होईल*

Comments