सर्वांग सुंदर व संपन्न देश घडवण्यासाठी आपले सर्वस्व द्या:नितीन जांभोरकर* *रा.स्व.संघाच्या वरोडा शाखेच्या विजयादशमी* *महोत्सवात केले आवाहन*
*रा.स्व.संघाच्या वरोडा शाखेच्या विजयादशमी* *महोत्सवात केले आवाहन*
वरोडा : श्याम ठेंगडी
राष्ट्रीय सेवक संघाच्या शताब्दी वर्षात संघाने सामाजिक समरसता, कुटुंब व्यवस्था, पर्यावरण, स्वदर्शन व नागरी व्यवहार या पंचसूत्री वर भर दिलेला आहे. या पंचसूत्रीच्या पूर्ततेसाठी तसेच समाजातील सर्व क्षेत्रात समाजाच्या उन्नतीसाठी जे आवश्यक आहे. त्या गोष्टींचा विचार करून संघ स्वयंसेवकांसोबत सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे.स्वातंत्र्याच्या अमृत अमृतकाळात सर्वांग सुंदर व सर्व संपन्न होईल असा देश पुढील 25 वर्षात घडवायचा आहे .यासाठी आपले सर्वस्व देण्याचा प्रण आपण सर्वांनी करावा असे आवाहन संघाच्या विदर्भ प्रांत महाविद्यालयीन प्रमुख नितीन जांभोरकर यांनी वरोडा येथे केले.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा शाखेच्या वतीने येथील स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबच्या मैदानावर 21 ऑक्टोबर रोज शनिवारला झालेल्या शस्त्रपूजन व विजयादशमी महोत्सवात ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वरोडा रोटरी शाखेचे सचिव अॅड. मधुकर फुलझेले यांच्या सोबत तालुका संघचालक सुनीलजी सरोदे व नगर संघचालक मनोजजी रेलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
देशाच्या आर्थिक विकासाचा ग्रामीण भाग हा कणा आहे. ग्रामीण भागात संघ म्हणावा त्या प्रमाणात पोहोचलेला नाही .ग्रामीण भागात संघ कार्य पोहोचले तर देशाला बळकटी मिळेल. आज देशासमोर धर्म परिवर्तन ही गंभीर समस्या आहे. कमकुवत आर्थिक बाजूचा गैरफायदा घेऊन हे धर्म परिवर्तन होत आहे. म्हणून नागरिकांची आर्थिक बाजू मजबूत होईल असे धोरण आखून त्यांना धर्माची शिकवण देणे आवश्यक आहे. आपल्याच लोकांना धर्माचे बाळकडू पाजण्याची गरज असून समाजातील जाती व्यवस्था नष्ट झाली तर विकासाचा महामेरू पुढे जाईल असे मत यावेळी अॅड. मधुकर फुलझेले यांनी व्यक्त केले.
संघ कोणाच्याही विरोधात नाही, तर हिंदू समाज व या देशाकडे कोणीही वाकड्या डोळ्यांनी पाहू नये यासाठी कार्य करीत आहे. सतत झालेले आक्रमण यामुळे आपली समाज व्यवस्था विस्कळीत झाली. आपण आपली पराक्रमी ,ज्ञानी,आध्यात्मिक चेतना असलेली ओळख विसरलो.. समाजातील जातीव्यवस्था यास काही प्रमाणात जबाबदार असून आज मात्र चित्र पालटले आहे. आपल्या विसरलेल्या ओळखीची व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच 1925 मध्ये संघाची स्थापना झाली.संघाच्या स्थापनेमुळेच आपण लढू शकतो ही भावना पुनरुज्जीवित होऊ शकली. हिंदूंमध्ये जागृती आली.हा केवळ हिंदूचा नाही तर राष्ट्रनिर्माणाचा विजय आहे असे सांगत प्रमुख वक्ता पुढे म्हणाले, देशासोबतच वैयक्तिकरित्या येणारा काळ हा महत्त्वाचा आहे. म्हणून यासाठी सर्व शक्तीने संघाच्या कार्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहनही नितीन जांभोरकर यांनी केले .
सुरुवातीला स्वागत प्रणाम झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन पूजन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर युगविह, समता, दंडक्रमिका या शारीरिक प्रात्यक्षिका सोबत आसन,योग,घोष प्रात्यक्षिक व विविध व्यायाम योग सादर करण्यात आले." युगो युगो से दुनिया चलती" हे सांघिक गीत झाल्यानंतर तालुका संघचालक सुनील सरोदे यांनी आपल्या प्रस्ताविकात सज्जनशक्तीला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यानंतर साहिल डोमकावळे यांनी सुभाषित तर ऋषभ बरडे याने अमृत वचन सादर केले. यावेळी मंगेश मल्हार यांनी "संघका है ध्येय शाश्वत " हे वैयक्तिक गीत सादर केले. अजिंक्य येनगंटीवार याने संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन केले.
या शस्त्रपूजन व विजयादशमी महोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वी नगरातील प्रमुख मार्गावरून गणवेश धारी सेवन सेवकांचे घोष पथकासह पथसंचलन काढण्यात आले होते.
Comments
Post a Comment