मजरा (खु) लहान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा


मजरा (खु) लहान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

वरोरा प्रतिनिधी
गांनीवत गेडाम
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेबांनी विजयादशमी १४ आक्टोंबर १९५६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन घडविले.या दिवशी त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसह भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा अंगीकार केला.त्या दिवशी विजयादशमी होती.त्यामुळे हा दिवस देशभर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.१४ आक्टोंबर ला बौद्ध बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून " तिमिरातून तेजाकडे" झेपावण्याची कास धरून महामानवाला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी मजरा खु लहान येथील पंचशील बौद्ध मंडळ व महिला मंडळ व उपासक -उपासिकाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध महासभा चे प्रचारक भाऊराव नीरंजने वरोरा,गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा सारिका धाबेकर, पत्रकार ग्यानीवंत गेडाम, पंच कमिटी मंडळाच्या अध्यक्षा रागिणी मानकर, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा मानकर, आबाजी रामटेके, अनुराग गडेकर, मारोती कवाडे, विद्या सोनटक्के यांची मंचावर पाहुणे म्हणून उपस्थिती होती. विहारातील बुद्ध मुर्तीला वंदन करून डा बाबासाहेब आंबेडकर.यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत  निरंजने यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.
व बुद्ध वंदना घेण्यात आली.उपस्थित उपासक- उपासिकांना  भाऊराव निरंजने यांनी धम्म प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते बाळु तितरे तर आभार ग्यानीवंत गेडाम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी  करण्याकरिता लालचंद पाटील, उमरे, सिद्धार्थ वानखेडे, वृंदा भगत, वंदना रामटेके, सुभाष सुखदेवे,  नागो पाटील,सुरेंद्र वावरे, कैलास गेडाम,पुष्पा पाटील,रमा गेडाम, शकुंतला गडेकर, उज्वला गेडाम, ज्योती सुखदेवे, यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments