विद्यार्थ्यांनी कौशल्या वर आधारित अभ्यासक्रम निवडणे काळाची गरज - डॉक्टर सागर वझे# पदवीदान समारंभात प्रतिपादन
विद्यार्थ्यांनी कौशल्या वर आधारित अभ्यासक्रम निवडणे काळाची गरज - डॉक्टर सागर वझे
# पदवीदान समारंभात प्रतिपादन
वरोडा दिनांक 12 ऑक्टोबर
बदलत्या काळासोबत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची निवड करावी. विद्यापीठाने कमवा आणि शिका हे धोरण स्वीकारले असून विद्यार्थ्यांनी सुद्धा आता पदवी मिळविताना त्यासोबतच कौशल्य प्राप्त करणे चे झाले आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ सागर वझे यांनी केले. लोकमान्य महाविद्यालयात आयोजित चतुर्थ पदवीदान समारंभात ते बोलत होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, स्वागताध्यक्ष प्राचार्य सुबोधकुमार सिंह तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा अनिल नानोटकर यांची उपस्थिती होती
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वझे पुढे म्हणाले की गोंडवाना विद्यापीठाने वन संपत्तीवर अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे आहे. पर्यटनाला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. ही युवाशक्ती राष्ट्रहिताच्या कामी यावी याचाही विचार महाविद्यालयातील अभ्यासक्रमात व्हावा असे ते म्हणाले. प्रा श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी पदवी चे शिक्षण घेताना सोबत नैतिक शिक्षणही घ्यावे. मिळालेली पदवी योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा फायदा आयुष्यात होतो असे ते म्हणाले. प्रा नानोटकर यांनीही आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सिंग यांनी तर सूत्रसंचालन प्रा अलका कुलकर्णी यांनी केले. प्रा योगिता गोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी कला आणि वाणिज्य शाखेतील 72 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या तर मराठी आणि इंग्रजी विषयातील 25 विद्यार्थ्यांना पदुत्तर पदवी प्रदान करण्यात आली
डॉक्टर सागर वझे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना सोबत उपस्थित मान्यवर
विद्यार्थ्यांनी कौशल्या वर आधारित अभ्यासक्रम निवडावे निवडणे काळाची गरज डॉक्टर सागर वझे पदवीदान समारंभात प्रतिपादन वरोडा दिनांक 12 ऑक्टोबर बदलत्या त्यासोबत विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची निवड करावी विद्यापीठाने कमवा आणि शिका तत्वाचा ला असून यांनी सुद्धा आता पदवी मिळविता मिळविताना त्यासोबतच कौशल्य प्राप्त करणे चे झाले आहे असे प्रतिपादन विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ सागर वझे यांनी केले लोकमान्य महाविद्यालयात आयोजित चतुर्थ पदवीदान समारंभात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील स्वागताध्यक्ष प्राचार्य सुबोध कुमार सिंह तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अनिल नानोटकर यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वसे पुढे म्हणाले की गोंडवाना विद्यापीठाने ता वनोपचावर तयार करणे गरजेचे आहे पर्यटनाला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ही युवाशक्ती राष्ट्रहिताच्या कामी यावी याचाही विचार महाविद्यालयातील अभ्यासक्रमात असे ते म्हणाले प्राध्यापक श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी पदवी चे शिक्षण घेताना सोबत नैतिक शिक्षणही घ्यावे मिळालेली पदवी योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा फायदा आयुष्यात होतो असे ते म्हणाले प्राध्यापक नानोटकर यांनीही आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सिंग यांनी तर सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले प्राध्यापक योगिता गोरे यांनी आभार मानले याप्रसंगी कला आणि वाणिज्य शाखेतील बहात्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या तर मराठी विषयातील पंचवीस विद्यार्थ्यांना पदुत्तर पदवी प्रदान करण्यात आली
Comments
Post a Comment