होऊ द्या चर्चा !” अभियानातून जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा भांडाफोड करा : रविंद्र शिंदे*
वरोरा : केंद्र व राज्य शासनाकडून जनतेच्या मतांचा सतत अनादर होत आहे. देशात व राज्यात सध्या जनकल्याणकारी कामे कमी परंतु घोषणाबाजी अधीक अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी दिसून येत आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत येत्या गणेश चतूर्थीच्या शुभ पर्वावर “होऊ द्या चर्चा !” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा ठिकठिकाणी जावून भांडाफोड करा, असे आवाहन पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.
वरोरा तालुक्यात ग्रामीण व शहरी क्षेत्रात “होऊ द्या चर्चा" अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व कामगार नेते तथा नगरसेवक मनोज जामसुतकर यांचे मार्गदर्शनात आज दि. १८ सप्टेंबर रोज सोमवारला स्थानिक शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे शिवसेना (उ.बा.ठा.) पदाधिकारी, युवा व युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक बंधू भगिनिंची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकिच्या अध्यक्षस्थानावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हा संघटीका सौ. नर्मदा बोरेकर, उप-जिल्हा प्रमुख श्री भास्कर ताजणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक श्री वैभव डहाणे, विधानसभा संघटक श्री मंगेश भोयर, भद्रावती तालुका प्रमुख श्री नंदू पढाल, तालुका संघटीका सरलाताई मालोकर, भद्रावती महिला शहर संघटक सौ. भावना खोब्रागडे, शहर संघटीका प्रीती पोहाने तालुका युवासेना अधिकारी श्री राहुल मालेकर, कृ.उ.बा.समिती, संचालक कल्पना टोंगे, सुषमाताई शिंदे, सुनील मोरे, यांच्या उपस्थितीत अभियानाबाबत चर्चा, मार्गदर्शन व आयोजनकरीता रूपरेषा ठरविल्या गेली.
सदर सभेला वरोरा शहर सम्नवयक राजु बिरीया, वरोरा उपशहर प्रमुख संजय नरोले, अभिजीत अष्टकार, नितीन जुमडे, शशिकांत राम, अनिल शंभु सिंग, उपतालुका प्रमुख खांबाडा आबमक्ता जि.प.गट सुधाकर बुऱ्हाण, उपतालुका प्रमुख चिकणी-टेमुर्डा जि.प.गट विलास झिले, उपतालुका प्रमुख शेगाव बोर्डा जि.प.गट अभिजीत पावडे, उपतालुका प्रमुख माढेळी नागरी जि.प.गट गोपाल देवतळे, उपतालुका प्रमुख चरुरखटी सालोरी जि.प.गट अरुण महल्ले, उपतालुका समन्वयक, माढेळी नागरी जि.प.गट बळीराम चवले, उपतालुका समन्वयक चरुरखटी सालोरी जि.प.गट सुरेश कामडी, उपतालुका समन्वयक माढेळी नागरी जि.प.गट मंगेश कुंडलकर, विभाग प्रमुख प्रशांत आवारी खांबाडा आबमक्ता जि.प.गट, विभाग प्रमुख गजानन गोवारदिपे, चिकणी टेमुर्डा जि.प.गट, विभाग प्रमुख चंद्रशेखर कापटे शेगाव बोर्डा जि.प. गट, विभाग प्रमुख गजानन वादाफळे माढेळी नागरी जि.प.गट, विभाग प्रमुख प्रकाश झाडे चरुरखटी सालोरी जि.प. गट उपविभाग प्रमुख माढेळी पं.स.गण चेतन सातारकर, उपविभाग प्रमुख नागरी पं.स.गण विनोद वाटमोडे, उपविभाग प्रमुख खांबाडा पं.स.गण निरज सायंकार, उपविभाग प्रमुख आबमक्ता पं.स.गण देवेंद्र बोधाने, उपविभाग प्रमुख टेमुर्डा पं.स. गण विक्की गायकवाड, उपविभाग प्रमुख चिकणी पंस.गण किशोर झाडे, उपविभाग प्रमुख शेगाव पं.स.गण राहुल जुंबाडे, उपविभाग प्रमुख बोर्डा पं.स.गण विजय डाखरे, उपविभाग प्रमुख चरुरखटी पं.स.गण सागर भोयर, उपविभाग प्रमुख सालोरी पं.स.गण प्रमोद तिवाडे शेगाव शहर प्रमुख गजानन ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी रविंद्र शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ? दाऊद आणि माल्याला फरफटत आणले का ? गंगा नदी स्वच्छ झाली का ? देशातील शहरे स्मार्ट झाली का ? काश्मिरी पंडित सुरक्षीत घरी परतले का ? मराठा समाजाला आरक्षण दिले का ? धनगर समाजाला आरक्षण दिले का ? ओबीसी समाजाच्या न्याय हक्क मागणीचे काय झाले ? गुगल बरोबर आठशे रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय देण्याचा साडे चार लाख कोटीचा करार केला. परंतु शेतकऱ्यांच्या शेत पिकांना हमीभावासाठी मदत का केली नाही ? मुख्यमंत्री योगी म्हणतात, उत्तर प्रदेशात ६३ गरीब बालकांचा मृत्यु ऑक्सीजनच्या तुटवड्याने नाही तर अस्वच्छतेमुळे झाला. मग स्वच्छ भारत अभियानाचे काय झाले ? जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नये म्हणून सांगतात परंतू तिकडे केंद्र सरकार मात्र चिनी कंपन्याना ठेके देत आहे. गरीबी, मंहागाई व बेरोजगारी कमी झाली काय ? होऊ द्या चर्चा अभियानातून असे विविध प्रश्न जनतेच्या दरबारात उपस्थित करून मतदारांना बोलके करा, असे प्रतिपादन सुध्दा रविंद्र शिंदे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी प्रास्ताविकातून "चला होऊ द्या चर्चा !" अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. नर्मदा बोरेकर, घनश्याम आस्वले, ज्ञानेश्वर डूकरे, भास्कर ताजने आणि बंडू पा. नन्नावरे यांनी आपल्या भाषणातून सदर अभियान राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मंगेश भोयर यांनी केले. या प्रसंगी वरोरा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शिवसैनिक फार मोठया संख्येत उपस्थित होते. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.
Comments
Post a Comment