वरोरा
वरोरा अवघ्या काही दिवसात सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असताना रोगाने पीक उध्वस्त केले याची पाहणी करण्याकरिता तज्ञांची चमु वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतातील बांधावर पोहचून तज्ञ समिती सदस्य व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.
सोयाबीन पिकातील शेंगांना दाणे भरत असताना सोयाबीन अचानक पिवळे पडले व वाळू लागल्याने शेंगांमध्ये दाणे भरणे बंद झाले त्यामुळे सोयाबीन पीक हातातून गेले या विवंचने संपूर्ण शेतकरी सापडले आहे. सोयाबीन वर कोणता रोग आला याच्या शोध घेणे त्यावर उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे ऍग्रो नॉमिस्ट व विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा टापरे, ब्रिडर डॉक्टर निचळ एनटोमोलोजिस्ट डॉक्टर मुंजे ,वनस्पती रोग शास्त्र डॉक्टर धाबडे, कृषी विद्याशास्त्रज्ञ डॉक्टर दांडगे, जिल्हा कृषी अध्यक्ष डॉक्टर तोटावार या समितीने वरोरा तालुक्यातील चीनोरा व शेंबळ गावाच्या शेत शिवारातील सोयाबीन पिकांची पाहणी केली यावेळेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सोयाबीन पिकावर हा आजार 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान आल्याची माहिती समिती सदस्यांना अवगत केली समितीने संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर हा अहवाल विद्यापीठाकडे देणार असल्याची माहिती दिली.
सोयाबीन पिकाचे रोगामुळे मोठे नुकसान झाले असून विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने नुकसान भरपाई चे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करावे याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजेंद्र चिकटे तालुका कृषी अधिकारी सुशांत लवटे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment