भारतीय जनता पार्टी वरोरा तर्फे घरगुती गणपती सजावट व उत्कृष्ट रिल स्पर्धा व उत्कृष्ट मूर्तिकारास प्रोत्सानपर बक्षिस चे आयोजन.

भारतीय जनता पार्टी वरोरा तर्फे घरगुती गणपती सजावट  व  उत्कृष्ट रिल स्पर्धा व उत्कृष्ट मूर्तिकारास प्रोत्सानपर बक्षिस चे आयोजन.

वरोरा शहरातील गणेशउत्सव निमित्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा व उत्कृष्ट रिल स्पर्धा भारतीय जनता पक्ष तर्फे आयोजित करण्यात आली आहे . सदर स्पर्धेमध्ये दिनांक १९/०९/२०२३ पासून २८/०९/२०२३ पर्यंत घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून ज्यामध्ये १५० घरगुती गणपती सजावट सदस्य नोदणी झालेली असून उत्कृष्ठ रिल  चे अनुषंगाने जवळपास ३०-४० रिल ची नोदणी झालेली आहे. तसेच उत्कृष्ठ मुर्तीकारास प्रोत्साहनपर बक्षिस देन्यात येनार आहे.  सदर स्पर्धेचे निकाल नवरात्र उत्सव या मुहुर्तावर करण्यात येत असून वरोरा शहरातील नागरीकांना आवाहन आहे की भारतीय जनता पार्टी तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत बहुसख्येनी सहभाग घ्यावा व गणेशउत्सवचा आनंद द्विगुणीत करावा.
सोबतच भारतीय जनता पक्ष, वरोरा तर्फे गणेश विसर्जनाला  सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचा सत्कार करण्याचा मानस आहे.

सदर स्पर्धेची संकल्पना भारतीय जनता पार्टी चे सदस्य तथा सिनेट सदस्य डॉ. सागर वझे यांची असुन मुख्य मार्गदर्शक  विधानसभा प्रमुख श्री रमेश राजुरकर, माजी नगराध्यक्ष अहेनेश्याम अली, प्रदेश सचीव  युवा मोर्चा श्री. करण देवतळे तालुका महामंत्री ओम प्रकाश  मांडवकर, जिल्हा महामंत्री ओबीसी डॉक्टर अंकुश आगलावे, यांचे सहकार्य लाभले आहे
तसेच सदर उपक्रम राबविण्याम भारतीय जनता युवा मोर्चा सदस्य श्री. अमित चवले', श्री. संजय राम, श्री. अभय माडावी, श्री संतोष पवार, पत्रकार श्री. सारथी ठाकुर, श्री. चेतन लुथड़े, यांचे परिश्रम लागले.

Comments