रोग निदान शिबिरातून आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा : आमदार प्रतिभा धानोरकर***वरोरा - भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते भव्य रोग निदान शिबिराचे उद्घाटन**

*रोग निदान शिबिरातून आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा : आमदार प्रतिभा धानोरकर*

**वरोरा - भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते भव्य रोग निदान शिबिराचे उद्घाटन**
चंद्रपूर :  "आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी सरकारच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, या शिबिराचा उद्देशही जनतेला निरोगी ठेवण्यासाठी आहे. या शिबिरात सर्वांना विविध प्रकारच्या आजारांची तपासणी आणि उपचार मोफत करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. 
वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते नेहरू शाळा, शेगाव (बु) येथे भव्य रोग निदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांची तपासणी आणि उपचार मोफत करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन पैगामे रजा सेवा संस्था आणि समस्त मुस्लिम बांधव यांनी केले होते. या शिबिरात डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, डोळे, कान, नाक, घसा, त्वचा, स्त्रीरोग, बालरोग, मानसिक आरोग्य आदी विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच, रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार आणि सल्ला देण्यात आला.
या शिबिरात शेगाव (बु) शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या शिबिराचे स्वागत केले आणि आभार मानले.

या शिबिरात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह, ठाणेदार अविनाश मेश्राम, सरपंच सिद्धार्थ पाटील, अध्यक्ष बशीर भाई कुरेशी, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजू चिकटे, उपाध्यक्ष सदनाताई नि. मानकर, माजी सरपंच यशवंत लोडे, सचिव अंसार रजा, डॉ. पठाण साहेब, ता.मु.अ. गजानन ठाकरे, मुख्याध्यापक बालाजी हाकुनकर, अब्दुल रहेमान साहेब, मो. शफी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments