वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.

वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यांसाठी  विशेष पॅकेज जाहीर करावे.

वरोरा
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्हयात सोयाबीन पिक ६७,७६६ हे. क्षेत्रावर घेतले जात असून मुख्यतः हे पिक वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व पोंभुर्णा या तालुक्यांत घेतले जाते. सोयाबीन पिकावर माहे ऑगस्ट महिन्यात वरोरा, चिमूर व भद्रावती या तालुक्यात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळून आला. कृषि विभाग व कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञांव्दारे क्षेत्रीय भेटीचे आयोजन करुन सदर रोगाच्या नियंत्रण व प्रसार आटोक्यात आणण्याकरीता गाव दवंडी भित्तीपत्रके, वर्तमानपत्रे व आकाशवाणीव्दारे प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता मोहिम स्वरुपात उपाययोजना करण्यात आल्या. दिनांक १५ ते १८ सप्टेंबर (पोळा सणानंतर) जिल्हयात सोयाबीनचे पिक अत्यंत योग्य अवस्थेत असतानांच अवघ्या ४८ तासांत काळे पडले होते. हा प्रकार एक-दोन शेतात नसून जिल्हयातील सर्वत्र दृष्टीस पडत आहे. याबाबत कृषि विभाग व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या क्षेत्रीय भेटीनंतर हे पिवळे पडलेले सोयाबीनचे मुख्य कारण पावसाचा खंड व जमीनीचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सीअस पर्यंत पोहोचल्याने विविध रोगांचे प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. प्रक्षेत्र भेटीचे वेळी पाहणी केल्यानंतर सोयाबीन पिकावर मुळकुज, खोडकुज व रायझोक्टोनीया एरीयल ब्लॉईट या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले व दोनच दिवसात सोयाबीन पिक पिवळे पडू पडले.
सोयाबीन पिकावर अशाप्रकारचे विवीध रोगांचा अचानकपणे मोठया प्रमाणावर व एवढया मोठ्या क्षेत्रावर प्रादुर्भाव होण्याची ही जिल्हयातील पहिलीच वेळ आहे. शेतकन्यांनी उपाययोजना करण्यापूर्वीच संपुर्ण प्रक्षेत्र प्रासीत झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. सोयबीन पिक पूर्ण परिपक्व होण्यापूर्वीच या रोगाच्या प्रादुर्भाव सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.

त्यामुळे या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. तरी प्राप्त परिस्थितीचा विचार करता राज्यशासनामार्फत नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे. ही विनंती.

Comments