शिक्षक दिनानिमित्त इनर व्हील क्लबचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम

शिक्षक दिनानिमित्त इनर व्हील क्लबचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम
शिक्षक दिनानिमित्त इनर व्हील क्लब चा नाविन्यपूर्ण कार्यक्रम
वरोरा
"गुरुविण न मिळे ज्ञान ज्ञानविन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया"
राष्ट्र घडणित महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षका प्रतीचा आदर व्यक्त करण्याच्या  उद्देशाने शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या भावनेतून इनरव्हील क्लब ने हिरालाल लोया स्कूल वरोरा येथील शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले यामध्ये रविकांत जोशी सर माया बजाज मॅडम व साधना ठक मॅडम यांना शाल श्रीफळ देऊन अवार्डने सन्मानित करण्यात आले
त्याचप्रमाणे तेथील स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदावन सोबत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला शाळेतील सर्व शिक्षकांना पेन देऊन सन्मानित करण्यात आले सोबतच शिक्षकांसोबत काही खेळ घेण्यात आले या खेळामध्ये प्रथम द्वितीय क्रमांकांना बक्षीस देण्यात आले यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाच्या खेळांचे आयोजन पूजा मुंदडा यांनी केले होते सूत्रसंचालन संध्या बाराई यांनी केले तसेच आभार प्रदर्शन उपाध्यक्ष कविता बाहेती यांनी केले सदर कार्यक्रमाला हिरालाल लोया स्कूलचे सर्व शिक्षक वृंद इनरव्हील  क्लबच्या अध्यक्षा वैशाली चहारे उपाध्यक्ष कविता बाहेती सचिव प्रतिभा मणियार जेनप सादीकोट पूजा मुंदडा संध्या बराई माया बजाज किरण जाकोटिया आरती भोयर आभा सायरे सारिका बावणे  योगिता मुथा व प्राजक्ता कोहळे उपस्थित होत्या

Comments