होऊ द्या चर्चा ! ’ चाआढावा घेण्यासाठी मनोज जामसुतकर मुंबईवरून थेट चंद्रपूरात दाखल* लोकसभा व विधानसभा क्षेत्रात "होऊ द्या चर्चा' ची जयत्त तयारी 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमासाठी वरोरा शहरात उद्या बैठक

 
 ‘ होऊ द्या चर्चा  ! ’  चाआढावा घेण्यासाठी  मनोज जामसुतकर  मुंबईवरून थेट चंद्रपूरात  दाखल*  

लोकसभा व विधानसभा क्षेत्रात "होऊ द्या चर्चा'  ची जयत्त तयारी

 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमासाठी वरोरा शहरात उद्या बैठक

वरोरा
चेतन लूतडे 

 वरोरा :- शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने  ‘ होऊ द्या चर्चा ! ’  बोलवेडया शिंदे सरकारच्या योजनांचा भांडाफोड अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. सदर अभियान अत्यंत प्रभावी व लोकभिमूख व्हावे. या हेद्दष्टीने पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे उपनेते व कामगार नेते तथा नगरसेवक  मनोज जामसुतकर  मुंबईवरून थेट चंद्रपूरात  काल दि. १६ सप्टेंबर रोज शनिवारला  दाखल झाले.
   याप्रसंगी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे , उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर पाटील ताजने आणि भद्रावती तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल  यांनी मनोज जामसुतकर यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. याप्रसंगी  मनोज जामसुतकर यांना 
७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील  ‘ होऊ द्या चर्चा ! ’  बोलवेडया योजनांचा भांडाफोड अभियानाच्या पुर्वतयारीची सविस्तर माहिती देण्यात आली. दि. १६ सप्टेंबर रोजी भद्रावतीच्या श्रीमंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीचा अहवाल सादर करण्यात आला.
 तसेच दि. १८ सप्टेंबर रोजी वरोरा येथे शिवालय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसंदर्भात माहिती देण्यात आली.
सोबतच पक्षाने या विधानसभा क्षेत्रात  विविध निवडणूकीत विजय संपादित केलेल्या संस्थेचा अहवाल , तसेच पक्षाच्या माध्यमातून  शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संदेशानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अंगीकृत करुन या  क्षेत्रात  राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहीती सुध्दा  देण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे उपनेते व कामगार नेते तथा नगरसेवक  मनोज जामसुतकर  यांनी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात  ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या  पक्षाच्या कामाबद्दल प्रसन्नता व्यक्त करुन भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सुध्दा  मार्गदर्शन केले.
    दि. १८ सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता वरोरा येथील पक्षाच्या शिवालय मध्यवर्ती कार्यालयात
  ‘ होऊ द्या चर्चा ! ’  बोलवेडया योजनांचा भांडाफोड अभियांतर्गत शिवसेना, युवा -युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक बंधू भगिनिंची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहावे . असे आवाहन ‘ शिवालय ’  वरोरा येथुन प्रसिध्दी प्रमुख रवि कावळे,किशोर उत्तरवार व जेष्ठ शिवसैनिक तथा माजी नगरसेवक प्रशात कारेकर यांनी  प्रसिध्द पत्रका द्वारे केले आहे.


होऊ द्या चर्चा या कार्यक्रमासाठी वरोरा भद्रावती क्षेत्रातील बैठकीचा वृत्तांत.

Comments