भावाची बहीणला रक्षाबधनानिमित्त अनोखी ओवाळणी

भावाची बहीणला रक्षाबधनानिमित्त अनोखी ओवाळणी

चेतन लूतडे वरोरा 

आश्वासनं देणाऱ्यांच्या गर्दित, वचन देणारा नेता,कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात, खंबीर साथ देणारा नेता,ज्यांच्या आशिर्वादाने माघारी खिंड लढवतो कार्यकर्ता,कार्यकर्त्यांसाठी जिवाचं रान करतो अमुचा नेता. अशाच नेत्यांसाठीच कार्यकर्ता तयार होतो. अशाच कार्यकर्त्यांमुळे नेत्यांची ओळख होते. अशीच एक घटना आहे वरोरा शहरातील साक्षी वैद्य यांची.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना तर्फे राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा , नागपूर येथे आयोजित करण्यात आली. त्या मध्ये साक्षी वैद्य ला सहभाग घ्यायचा होता पण एकटी मुलगी नागपूर कशी जाणार तेव्हा जिल्हायुवती प्रतिभाताई मांडवकर, युवासेनेचे अभिजित दादा कुडे, निखिल दादा मांडवकर हे सोबत या स्पर्धेसाठी गेले होते.
त्या स्पर्धेत आपल्या  या लहान बहिणीने
बाजी मारली व पूर्व विदर्भातून  तृतीय क्रमांक पटकाविला. त्या नंतर अंतिम फेरी मुंबई येथे होणार होती. मग एकटी मुलगी जाणार कशी? त्यामुळे उद्धव बाळासाहेब गटाचे नेते रवींद्र शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला . आपल्या कार्यकर्त्यांसाठी तत्पर असणारे भाऊनी रेल्वे ची आरक्षित तिकीट काढायला सांगितले व पूर्ण व्यवस्था करतो असा धीर दिला. पण साक्षीचा 1 सप्टेंबरला तलाठी पेपर असल्याने रेल्वेने जाणे शक्य नव्हते, मग काय भाऊंने आपल्या कार्यकर्त्यांचे म्हणने ऐकून घेतले. सोबतच विमानाची तिकीट काढून साक्षीला सोबत घेऊन गेले. भाऊसोबत विमानाचा प्रवास अविस्मरणीय ठरला. विमानाने उड्डाण भरून शेवटी साक्षीने मुंबई गाठली. आणि मुंबई येथील वक्तृत्व स्पर्धेसाठी हजर झाली.
30 तारखेला रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात वरोरा शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नर्मदाताई पेंदोर यांनी साजरा केला गेला होता. शेकडो बहिणीने रवींद्र शिंदे यांना भाऊ म्हणून राख्या बनल्या होत्या. अशाच एका बहिणीला विमानाची तिकीट काढून अनोखी ओवाळणी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाऊंचे धन्यवाद मानले असून हाकेला धावून येणारा नेता. म्हणून कार्यकर्त्यांनी ओळख दिली आहे.
तर महिला कार्यकर्त्यांनी जे प्रत्येक मुली, स्त्री चा सन्मान करतात व आपल्या बहिणी प्रमाणे मानतात व स्त्री च्या सुरक्षितत्तेची पूर्ण काळजी घेतात. अशा रवींद्र शिंदे यांना महिला आघाडीने धन्यवाद देण्यात दिले आहे. त्यांच्या या स्वभावामुळे व नेतृत्वामुळे अनेक तरुण उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहे.
जनता सुद्धा अशा नेत्यांना भरभरून आशीर्वाद देतात हे तेवढेच खरे....

Comments