जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनीचा पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण

जी एम आर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनीचा पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन द्वारे आज १६ सप्टेंबर २०२३ रोजी माजरा खुर्द
गावातील मामा तलाव परिसरातील चार एकर बंजर जमिनीवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
कंपनीचे प्रमुख माननीय श्री धनंजय देशपांडे, सीओओ थर्मल, आणि इतर अधिकारी श्री विनोद पुसदकर, श्री. आकाश सक्सेना,श्री. प्रवीण शेट्टी, श्री. इब्राहिम शेख आणि गावातील प्रमुख माननीय सरपंच सौ. वंदना हर्षल निब्रट व इतर मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

वृक्षारोपण कार्यक्रमात फणस, आंबा, कडुलिंब, पिंपळ या फळझाडांची पर्यावरणपूरक व सावली देणारी झाडे निवडण्यात आली. याप्रसंगी कंपनीचे 9० हून अधिक कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सामाजिक व पर्यावरणपूरक जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी वृक्ष लागवडीच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आणि 800 हून अधिक झाडे लावली. वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कंपनी (GWEL) मार्फत वृक्षारोपणाभोवती कुंपण घालण्यात आले असून, लावलेल्या झाडांचे संरक्षण व जतन करता यावे यासाठी पाणीपुरवठ्यासाठी हातपंप बसविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने संमती देऊन लावलेली झाडे वाचवण्याची शपथ घेतली आणि भविष्यात झाडांमुळे निर्माण होणारी हिरवाईचा विचार करून कंपनीचे (GWEL) भरभरून कौतुक केले. पुढील टप्प्यात हे संख्या २००० वृक्षाची करण्यात येईल व हा परिसर संपूर्ण हिरवागार करण्यासाठी जी एम आर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संकल्प केलेला आहे. या परिसरात फळझाडे लावून संगोपन केल्यास परिसरातील ग्रामस्थांना व त्यांच्या कुटुंबियांना फळ उपलब्ध होतील व हा परिसर भविष्यात कौटुंबिक एकत्रीकरण करिता उपलब्ध होईल असा विस्वास श्री धनंजय देशपांडे यांनी व्यक्त केला तसेच ग्रामपंचायत माजरा येथील सर्व सदस्यांप्रती आभार व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तंटामुक्त समिती, ग्रामसंघ माजरा खुर्द बचत गटाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments