वरोरा शहरात भव्य दिव्य दहीहंडी उत्सव व राधाकृष्ण सजावट कार्यक्रम साजरा

वरोरा शहरात भव्य दिव्य दहीहंडी उत्सव   व राधाकृष्ण सजावट कार्यक्रम साजरा

वरोरा
चेतन लूतडे
कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला तर दहीहंडी नवमी तिथीला साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाजपाचे युवा नेते व सिनेट सदस्य डॉक्टर सागर वजे यांच्या नेतृत्वात वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या स्फूर्ती स्पोर्ट क्लब च्या भव्य पटांगणात स्वर्गीय विनायक वझे व रोट्रॅक क्लब आयोजित  दहीहंडी महोत्सव  व राधाकृष्ण फॅन्सी ड्रेस स्पर्धचे आयोजन भव्य दिव्य  करण्यात आले.
डी एस के सिटी जाण्याचा मार्ग ..निळ्या रंगाच्या अक्षराला क्लिक करा.
..................

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात वरोरा शहरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दहीहंडी व राधाकृष्ण स्पर्धेसाठी अनेक स्पर्धकांनी भाग घेतले होते यादरम्यान लहान मुलांनी राधाकृष्ण बनुन सुंदर कपडे परिधान केले होते. यासाठी डॉक्टर सागर वझे तर्फे रोख पारितोषिक व शील्ड देण्यात आले.तसेच  तीस फुटावरती लावलेल्या दहीहंडी फोडण्याची  स्पर्धा घेण्यात आली होती. हा थरार पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करून होते. हा सण कृष्ण भक्तांसाठी पर्वणीच ठरते. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी  आलेले गोविंदा व प्रसाद मिळविण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करून होते. गोविंदा गोविंदाच्या गजरात हा सण मोठ्या उत्साहात वरोरा शहरात पार पडला. डॉक्टर सागर वझे यांनी  वरोरावासियांसाठी विकासात्मक कामे करण्याची गरज असून येणारे सण मोठ्या उत्साहात साजरे करू असा सुखद दिलासा त्यांनी दिली. त्यामुळे नक्कीच भाजपा मधील नेते कामाला लागलेले असल्याचे लोकांना जाणवले.
दहीहंडी फोडण्याकरिता आलेल्या स्पर्धाकांसाठी सुद्धा रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी परिसरातील बालक युवक, युवती सन्मानित शहरातील मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

दहीहंडी व राधाकृष्ण सजावट कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रमेश राजूरकर,भाजपा नेते डॉक्टर सागर वझे, माजी.न.प. अली, डॉक्टर भगवान गायकवाड, डॉक्टर अंकुश आगलावे, करण देवतळे, नितेश जयस्वाल, ओम मांडवकर, आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

World Cup 2023 ka pura sedule

Comments