किशोर डुकरे यांच्या वाढदिसानिमित्त शालेय किट वाटप

किशोर डुकरे यांच्या वाढदिसानिमित्त शालेय किट वाटप
वरोरा

सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचनारे शेतकरी नेते मा.किशोर भाऊ डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आसाळा या गावी असंख्य कार्यकर्ते सोबत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
 ज़िल्हा परिषद शाळा आसाळा येथील शाळकरी विद्याथ्यांना शालेय उपयोगी 'शालेय किट' चे वाटप करण्यात  आली.
दुपारी दोन वाजता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यात आले तसेच नवजात बालकांना नवीन कपडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, गावातील नागरिक,   तंटामुक्ती अध्यक्ष, टेमुर्डा . सचिन भोयर,तंटामुक्ती अध्यक्ष आशिष जांभुळे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू वासेकर, अनिकेत झिले, निखिल तिखट, अमन गाढवे व समस्त मित्र, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मित्र परिवार उपस्थित होता.

Comments