वरोरा :-
वरोरा शहरात गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि अनेक गणेश मंडळ ही गणेश मूर्तीची स्थापना करत असतात. सलग दहा दिवस मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते. वरोरा शहरात दिनांक 30 सप्टेंबरला बाप्पाचे विसर्जन होणार आहे. बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी शहरात दिव्य- भव्य यात्रा भरत असते.ज्यामध्ये शहरातील आणि बाहेरगावातील लोक या ठिकाणी आपापली दुकाने ही मांडतात आणि फार प्रचंड प्रमाणात लोक सुद्धा यात्रेला सहभागी होतात. येथे येणाऱ्या दुकानदारांना आणि लोकांना स्थानीय नगर परिषदेने 1) संबंधित परिसर स्वच्छ करून देण्यात यावा, 2) स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात यावी, 3) दुकानदारांना आपली दुकाने व्यवस्थितपणे लावता आली पाहिजे करिता नप.ने नियोजन करावे, 4) न.प.अधिकृत ठेकेदारा द्वारे दुकानदारांकडून अवैध वसुली होणार नाही याची दक्षता न. प.घेतली पाहिजे. या चार मागण्याचे निवेदन हरीश के शवानी (पत्रकार ),मनीष जेठानी युवासेना जिल्हा अध्यक्ष,अनिल झोटिंग माजीउप नगराध्यक्ष यांनी दिले.
Comments
Post a Comment